आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेते म्हणजे राजे शिवछत्रपती – अशोकराव धायगुडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, अशी ओळख असणारे शिवराय हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढत नाही, असा मराठी माणूस शोधूनही सापडायचा नाही,असे प्रतिपादन कार्यालयीन प्रमुख अशोकराव धायगुडे यांनी केले.
येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते स्थानावरून त्यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकला.विषय मांडणी करताना ते पुढे म्हणाले,”जेव्हा अखंड हिंदुस्थानात सुलतानी धुमाकूळ चालला होता, तेव्हा अंधारात प्रकाशाची एक शलाका तेजःपुंज व्हावी, तद्वत महाराष्ट्रधर्म आणि महाराष्ट्रराज्य या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य शिवप्रभूंनी केले.अष्टप्रधान मंडळाविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले उपस्थित होते. प्रारंभी छत्रपतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मूल्यमापन प्रमुख भास्कर डोंगरे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. तर प्रिती शेंडे यांनी वैयक्तिक पद्य गायले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संस्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी अभ्यास पुरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार,विनायक इंगळे ,विश्वजीत श्रीखंडे , गुरूदत्त महामुनी ,संदीप जाधव व संतोष कोले यांनी मेहनत घेतली.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात आयोजित भव्य शिवरँलीत लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचा सुंदर चित्ररथ व 200 विद्यार्थी आकर्षक शिवकालीन वेशभूषेसह सहभागी झाले.यामध्ये एन.सी.सी.पथक,घोषपथक,मावळे पथक,लेझीम पथक सहभागी होते.घोषपथकातील वाद्यवृंदांनी व लेझीम पथकाच्या सादरीकरणांनी उदगीर शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी भाशिप्र संस्थेचे केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे ,मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.