वाढवणा पोलिसांची पुन्हा अवैध दारू विक्रीवर धाड, 71 हजाराचा मुद्देमाल जप्त !!

वाढवणा पोलिसांची पुन्हा अवैध दारू विक्रीवर धाड, 71 हजाराचा मुद्देमाल जप्त !!

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुक्यातील वाढवणा हद्दीमध्ये चोरट्या पद्धतीने अवैध देशी दारूची वाहतूक करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना विक्री करणाऱ्या लोकांवर कडक नजर ठेवून धाडी टाकण्याचे सत्र वाढवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक वेगवेगळ्या भागात जाऊन धाडी टाकत आहेत. परवाच मोठ्या प्रमाणात धाडी यशस्वी झाल्यानंतर पुन्हा 19 फेब्रुवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास कोदळी चोंडी ते सुमठाणा गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला आरोपी संतोष पंढरी एकरूपे वय 30 वर्ष रा. कोदळी ता. उदगीर हा आपल्या फायद्यासाठी देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे कागदी लेबल असलेल्या काचेच्या 180 एम एल च्या 25 बॉटल, प्रति बॉटल 70 रुपये प्रमाणे अंदाजे किंमत सतराशे पन्नास रुपये व होंडा एक्टिवा स्कुटी ज्याच्या पाठीमागच्या बाजूला तीन चाकी असलेली चॉकलेटी कलरची जुनी वापरात असलेली अंदाजे किंमत 70 हजार रुपये असा एकूण 71 हजार रुपये 750 चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नायक इकराम बशीरसाब उजेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 30 /23 कलम 65 (अ) (इ ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये आरोपी संतोष पंढरी एकरूपे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजी सोनवणे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

About The Author