बखर हौतात्म्य महानाट्याची नळदुर्ग क्षेत्रभेट

बखर हौतात्म्य महानाट्याची नळदुर्ग क्षेत्रभेट

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था तसेच श्यामलाल कला,क्रीडा व विज्ञान अकॅडमी प्रस्तुत मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित “बखर हौतात्म्याची “हे महानाट्य सादर होणार आहे. याचे ओचित्य साधून मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी हौतात्मे पत्करलेल्या तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून कार्य केलेल्या निलंगा, उमरगा, गुंजोटी अणदुर, नळदुर्ग परिसरातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, सहसचिव अंजुमनीताई आर्य, शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनीकर, सर्व आस्थापना प्रमुख, क्षेत्रभेटीतील सहभागी विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करून त्यांना “बखर हौतात्म्याची ” या महानाट्याचे निमंत्रण देण्यात आले.

निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वतंत्र सैनिक स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वंशज अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, तसेच बळीराम पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अशोकराव पाटील निलंगेकर यांनी स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक म्हणून भूमिका तसेच मराठवाड्याचा विकास करण्यासाठी जे जे कार्य केले त्याची माहिती उपस्थित सर्वांना दिली. याप्रसंगी ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांची शौर्यगाथा तरुणासमोर यावी, यासाठी आपण बखर हौतात्म्याची हे महानाट्य सादर करणार आहोत , मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचा त्याग, देशप्रेम, जाज्वल्य इतिहास आपण आपल्या कृतीतून पुढे नेऊ या, व तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श देऊ या. असे मत व्यक्त केले.

उमरगा, गुंजोटी, अणदूर परिसरातील हौतात्म्याच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना उमरगा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था व श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमी द्वारे भास्कर विश्वनाथ साळुंखे (गुंजोटी ), सतीश गणपतराव पाटील (गुंजोटी ), चनाप्पा गुरसंताप्पा माळगे ( गुंजोटी), प्रबोध रामराव राकेलकर ( गुंजोटी ), लक्ष्मणराव मोरे (उमरगा ), अरविंद दिगंबरराव पोतदार, शरयू दिगंबरराव पोतदार( उमरगा), श्रीनिवास श्रीधरराव राजेश्वरकर (उमरगा ), मुरलीधर मुगळीकर (उमरगा ), बलभीम पाटील (उमरगा ) इत्यादी हुतात्म्याच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना हुतात्मा स्मारक उमरगा तेथे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी शहीद हुतात्म्यांच्या कार्याचा उजाळा करण्यात आला,श्यामलालजी आर्य यांच्या देशप्रेम,समाजहित, धाडसी कर्तृत्वमुळेच मराठवाडा मुक्ती संग्रामाची पायाभरणी झाली, विजयाची घोडदौड सुरू झाली. असे मत उमरगा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केले.

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर बखर हौतात्म्याची या महानाट्यात सहभागी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट उपक्रम आयोजित करण्यात आला. क्षेत्रभेटीत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्था सचिव ऍड. विक्रम संकाये, पत्रकार रामभाऊ मोतीपवळे व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर विविध प्रेक्षणीय स्थळांचे निरीक्षण केले, माहिती घेतली, किल्ल्यावर विविध ठिकाणी भ्रमण करून आनंद घेतला. क्षेत्रभेट यशस्वीरित्या संपन्न झाली.

About The Author