विज्ञानाला आध्यात्माची जोड असेल तरच जगात शांती नांदेल – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर

विज्ञानाला आध्यात्माची जोड असेल तरच जगात शांती नांदेल - माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर

लातूर (दयानंद स्वामी) : ज्ञानाला आध्यात्माची जोड असेल तरच जगात शांती नांदेल, प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी विज्ञानाची जोड आसने गरजेचे आहे, परंतु केवळ विज्ञान हे जगाला प्रगत ठेवू शकत नाही त्याला आध्यात्मिक जोड असेल तरच जगात शांती राहील असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले. लातूर येथे माजी मुख्याध्यापक विजय शंकरराव चव्हाण लिखित समाजचिंतक या मुक्तरंग प्रकाशनच्या वतीने काढण्यात आलेल्या देशातील राजकीय, साहित्य,संस्कृती, शिक्षण,सहकार,अध्यत्म,पत्रकारिता,प्रकाशन,धार्मिक, सामाजिक क्षेत्रात वैशिष्ट्य पूर्ण कार्यकरणाऱ्या व्यक्तीच्या चिंतनशील प्रयोगाचा आढावा असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विट्टल रुक्मिणी मंदिर पंढरपूर चे अध्यक्ष गुरुवर्य गहिनिनाथ महाराज औसेकर यांची उपस्थिती होती. तर यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खा.डॉ जे.एम.वाघमारे, आ विक्रम काळे,माजी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार,भाई धनंजय उद्धवराव पाटील,प्रा डॉ शेषेराव मोहिते,प्रा डॉ रणजित जाधव यांची उपस्थिती होती. लोकशाही भक्कम करायची असेल तर राजकीय,सामाजिक समानतेच्या सोबतच आर्थिक समानता येण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत आपण जोपर्यत समाजातील सामाजिकचिंतन करणाऱ्या व्यक्ती विषयी वाचणार नाही तोपर्यत हे अभिसरण शक्य नसल्याचे सांगत ,समाज चिंतनाचे कार्य अवघड आहे ,महात्मा गांधी हे केवळ त्यांच्या चिंतना मुळे महात्मा झाले ,स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या समवयस्क लोकांच्या यशोगाथा पुस्तक रूपाने मांडल्या त्या अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या तसे विजय चव्हाण यांचे समाजचिंतक हे पुस्तक प्रत्येक व्यक्तींच्या कार्याचा दस्तावेज नसले तरी त्यातील मांडणी एकदम गोड स्वरूपाची आहे.ती आपणाला त्या व्यक्तीच्या आठवणीत रमवते त्यांनी या पुस्तकातील ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या वरती स्वतंत्र पुस्तक लिहावे असे शिवराज पाटील चाकूरकर यावेळी म्हणाले. आपणाला या पुस्तकांतील भावलेले व्यक्तिमत्व हे भाई उद्धवराव पाटील असून आपण आपल्या राजकीय जीवनात त्यांचा पराभव केला होता परंतु आयुष्यात ज्या व्यक्तीचे काम आपणाला भावले त्या व्यक्तीचा आपल्या कडून पराभव झाल्याचे दुःख आपणाला झाल्याचा उल्लेख करीत या पुस्तका मुळे आपणाला आपल्या सोबतच केशवराव सोनवणे,माणिकराव सेनवणे, विलासराव देशमुख यांनी लातूर आणि राज्यच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा आलेख समोर आल्याचे सांगत भाई उद्धवराव पाटलांचा विचार हा शेतकऱ्यां सह कष्टकरी माणसांना तारणारा होता . या विचारांची आणि त्यांनी ज्या प्रमाणे शेकाप सोबत शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठा ठेवली त्या निष्ठतेची आज गरज असल्याचे सांगत चाकूरकर यांनी अनेक राजकीय आणि आपल्या व माजी खा जे.एम.वाघमारे यांच्या शैक्षणिक आठवणींना यावेळी उजाळा दिला.

   यावेळी बोलताना माजी खा डॉ जनार्दन वाघमारे यांनी या पुस्तकाचे लेखक विजय चव्हाण हेच मुळात समाजचिंतक आहेत असा उल्लेख करीत जो दुसऱ्याची पिढा जाणतो तो खरा वारकरी असल्याचे सांगत विजय चव्हाण हे विज्ञान विषयाचे शिक्षक परंतु त्यांची आध्यात्मिक बैठक आणि सामाजिक धडपड याचा आविष्कार म्हणजे हे पुस्तक होय असे  ते म्हणाले. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेरणेचे झरे असतात ते झरे कुठल्यानं कुठल्या पुस्तकाच्या वाचनातूनच निर्माण होतात आणि माणसाचे आयुष्य बदलून जाते माणसांच्या जीवनात माँतृ ऋण ,पितृ ऋण , गुरू ऋण तसे  समाज ऋण असते समाजात लहान मोठी माणसे असतात, जसे लहान मोठे दिवे प्रकाश देतात तो प्रकाश त्यांचे वलय तसे प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व असते ते आपल्या शब्दात टिपून ते समाजासमोर मांडण्याचे कार्य म्हणजे एक प्रकारे समाज ऋण फेडण्याचेच काम विजय चव्हाण यांनी या पुस्तकांच्या माध्यमातून केल्याचा उल्लेख डॉ जनार्दन वाघमारे यांनी यावेळी बोलताना केला.
  आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री विट्टल रुक्मिणी मंदिर पंढरपूर चे अध्यक्ष गुरुवर्य गहिनिनाथ महाराज औसेकर म्हणाले समाजात दोन प्रकारचे लोक असता एक स्वार्थी तर दुसरे प्रमार्थी जे स्वतः पेक्षा दुसऱ्या च्या अडचणी सोडविण्यात मदत करतात विजय चव्हाण हे त्यापैकी असून ते सच्चे गुरु भक्त आहेत. त्यांच्या प्रयत्ना मुळे तेरच्या गोरोबाकाका यांच्या पालखी व्दारे येणाऱ्या पादुकांचे  पंढरपूर येथी मंदिरात पालखीला आत प्रवेश मिळाल्या मुळे इतिहासात पहिल्यादा काका आणि पांडुरंग यांची भेट झाली, याचे श्रेय विजय चव्हाण सारख्या सच्चा शिष्याला मिळणे हे महत्त्वाचे आहे, असे सांगत समाजातील ओळखीच्या लोकांना लेखनातून समोर आणणे सहज शक्य आहे परंतु चव्हाण यांच्या पुस्तकात कांही समाजासाठी झटणारे परंतु प्रसिद्धीपासून कोसो दूर असणाऱ्या व्यक्तीविषयी ही मांडणी केलीय ही समाजाला प्रेरणादेणारी आहे असे औसेकर महाराज यावेळी म्हणाले, प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विजय चव्हाण हे आपल्या परिवारातील असून त्यांनी वयाच्या 75 मध्ये हे महत्वपूर्ण लेखन केले भविष्यात त्यांनी आयुष्याचे शतकपूर्ण करावे असा उल्लेख यावेळी केला.

प्रारंभी प्रा डॉ रणजित जाधव यांनी लेखकाचा जीवनपट मांडत अंत्यत प्रभावी पध्दतीने पुस्तकांविषयी प्रस्तावना केली.तर विजय चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मुक्तरंग प्रकाशनचे आभार मानीत देशाचे,राज्याचे शासक कांही निर्णय करताना त्याचे बरे वाईट परिणाम समाज जीवनावर होतात.पण समाजातील ऐक्य,बंधुभाव, प्रेम,जिव्हाळा, आत्मीयता टिकून रहाते ती साधुसंतामुळे,व विचारवतामुळे हे वास्तव आहे .समाजातील मानवतावादी मूल्य ,लोकशाही हा आपला प्राण आहे आपल्या जीवनात ज्या लोकांमुळे आपण प्रभावी झालो त्याच्या प्रती शब्दांतून व्यक्त होण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत आपल्या मनोगतात मांडले.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले तर शेवटी डॉ हरीश चव्हाण यांनी आभार मानले. भालचंद्र ब्लड बँकेच्या हॉल मध्ये आयोजित या प्रकाशन सोहळ्याला लातूर तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील विजय चव्हाण यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दिलीप गुंजरगे, प्रा शिवाजी काळे,ऍड वसंत उगले,अविनाश चव्हाण,पांडुरंग देडे,अरविद कांबळे,डॉ हरीश चव्हाण,विवेक सौताडेकर,प्रा सतीश इंगळे,प्रताप माने पाटील,बळीराम पानढवळे,मधुकरराव पाटील,प्रा उदय पाटील,प्रा अर्जुन जाधव,विश्वनाथ होळकुंदे,दशरथ जाधव,बालाजी झाडके,यांनी परिश्रम घेतले.

About The Author