शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलन चा दणका ५३ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी ६४ लाख पीकविमा वाटप सुरू
लातूर (दयानंद स्वामी) : शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून पीकविमा वाटप सुरू झाले आहे.पहिल्या टप्प्याय ५२ हजार ९९५ शेतकऱ्यांना ३४ कोटी ६४ लाख रुपये वाटप केले जात आहेत. शेतकरी नेते व शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने आणि त्यांचे सहकारी खरीप हंगाम २०२२ चा पीकविमा मिळावा यासाठी मागील ४ महिन्यांपासून लढा देत आहेत. रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, हलगी आंदोलन,आमरण उपोषण अशी आंदोलने त्यासाठी करण्यात आली.दिनांक २१ ते २५ जानेवारी असे ५दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासन आणि विमा कंपनीने लेखी आश्वासन देत १० तारखेपर्यंत पैसे खात्यावर टाकू असे सांगितले.३० तारखेस कृषी आयुक्तांसोबतच्या बैठकीत सर्व प्रश्न सोडवू,असे सांगितले.त्या बैठकीत विमा कंपनीने पंचनामे करण्याचे आश्वासन दिले पण अद्याप पंचनामे मिळाले नाहीत. त्याच्या मिनिट्स ऑफ मीटिंग पण उपलब्ध झाला नाही असे जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागामार्फत सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर नाही हेच यावरून लक्षात येते.१० तारखेपर्यंत पैसे जमा न झाल्यामुळे,परत शिवजयंती दिनी,१९ फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्यानंतर दि.११पासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात पीकविमा जमा होण्यास सुरुवात झाली.कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी ६४ लाख रुपये रक्कम मंजूर झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळे हे शक्य झाले. याचे श्रेय एकत्रित लढा दिलेल्या शेतकऱ्यांचे आहे. हा प्रश्न केंद्रात मांडण्यासाठी सर्व माहिती देऊन खा.श्रृंगारे यांना ड्राफ्ट दिला.या आंदोलनामुळे खासदारांनी हा विषय मांडला.त्याबद्दल आंदोलनाच्या वतीने आभार मानण्यात आले. ११ फेब्रुवारी पासून पैसे जमा होण्यास सुरू झाल्यामुळे १९ फेब्रुवारीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.आणखी बरेच शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. त्यांची माहिती संकलित केली जाईल व त्यांच्यासाठी लवकरच मोठा लढा उभारण्यात येणार आहे.आंदोलनाची पुढची रणनीती म्हणून शिवजयंती दिनी “शेतकरी क्रांती आंदोलन” या नावाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी अराजकीय मंच उभा केला जाणार असून त्याची घोषणा करण्यात येणार आहे. गावनिहाय हा मंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करेल.त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करेल.त्यासाठी लवकरच कार्यकारिणी स्थापन केली जाईल.शेतकऱ्यां साठी आक्रमकपणे काम करेल.
येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात पीकविम्याचा प्रश्न मांडावा म्हणून सर्वप्रथम जिल्ह्यातील सर्व आमदारांना विनंती केली जाईल.त्यासाठी त्यांना शेतकरी क्रांती आंदोलनाच्या वतीने सर्व माहिती देऊ.प्रसंगी त्यांना भाग पाडू.तसेच महाराष्ट्रातील सर्व २८८ आमदार, ४८ खासदार,विधानपरिषद आमदार, राज्यसभा खासदार, विरोधी पक्षनेते,सर्व पक्षांचे गटनेते यांना देखील पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रश्नावर लोकसभा,विधानसभा, विधानपरिषद,राज्यसभा या सभागृहामध्ये आवाज उठवावा व विमा योजना कार्यान्वित करावी यासाठी पत्र पाठवून आवाहन केले जाणार आहे.त्यासाठी शेतकरी क्रांती आंदोलन मार्फत दबाव गट तयार केला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून राज्य शासनाने जे शेतकरी विमा जाचक नियम अटी मध्ये बसत नाही त्यांना सरसकट अनुदान द्यावे.खरीप २०२३ साठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे धोरण, योजना राबवावी ही विनंती केली जाणार आहे.जाचक नियम,अटी रद्द करण्यात याव्यात.शेतकरी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जाऊ नयेत.दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी केली जाणार आहे.
शेतकरी क्रांती आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामपंचायती,संघटना,पक्ष, आमदार,खासदार,छत्रपती संभाजी राजे,सर्व शेतकरी, युवक, पत्रकार, पोलीस प्रशासन यांचे शेतकरी नेते सचिन दाने यांनी आभार मानले.शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळे पर्यंत शेतकरी क्रांती आंदोलन संघर्ष करीत राहील. शेतकऱ्यांनी अन्याय सहन न करता,जात-पात,धर्म,पक्ष बाजूला सारून एकजुटीने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व शेतकरी क्रांती आंदोलनात सक्रिय होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करावे असे आवाहन शेतकरी नेते, शेतकरी क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन दाने यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी सचिन दाने यांच्या सोबत सहकारी शेतकरी नेते गोपाळकाका पवार, पाशाभाई शेख, धनंजय भोसले, सुधाकरआबा गरड, मलिकर्जूनअप्पा हलकंचे, परमेश्वर माने, नितीन औसेकर, रोहित कासगुडे, कृष्णा औसेकर, भाऊसाहेब माने, मुबिन शेख, विकास पवार, भगवान शिंदे आदी उपस्थित होते.