उदयगिरीच्या राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्र सैनिकांचे पोलीस यंत्रणेला निवडणूक बंदोबस्त कार्यात सहकार्य
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रसैनिकांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदगीर येथील विविध मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्ताच्या कार्यात पोलीस यंत्रणेला सहकार्य व मदत करण्याचे कार्य केले आहे. यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या अपंग, वृद्ध मतदारांना मदत करणे तसेच मतदान केंद्रा बाहेरील शांतता व शिस्त निर्माण करणे बाबत पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे कार्यही राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी केले आहे. या कार्यासाठी छात्र सैनिकांना 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे प्रभारी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल वाय.बी. सिंग, कंपनी कमांडर कॅप्टन डॉ. राम साबदे तसेच पोलीस यंत्रणेचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदाना रोजी पोलीस यंत्रणेला मदत व सहकार्य करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के आणि उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.