सकाळी आठ वाजल्यापासून आयटीआय कॉलेज देगलूर रोड येथे मतमोजणी सुरू होणार

0
सकाळी आठ वाजल्यापासून आयटीआय कॉलेज देगलूर रोड येथे मतमोजणी सुरू होणार

सकाळी आठ वाजल्यापासून आयटीआय कॉलेज देगलूर रोड येथे मतमोजणी सुरू होणार

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक उदगीर विधानसभा मतदारसंघात 67.11 टक्के मतदान झाले असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी शासकीय आयटीआय कॉलेज देगलूर रोड उदगीर येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी कळविले आहे. सदर मतमोजणीसाठी एकूण 25 टेबल चे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 14 टेबल ईव्हीएम यंत्रातील मतमोजणीसाठी, नऊ टेबल टपाली मतपत्रिकांसाठी तसेच दोन टेबल ईटीपीएस द्वारे मतमोजणीसाठी असतील, मतमोजणीसाठी प्रत्यक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले असून एकूण 26 फेरीमध्ये मतमोजणी संपन्न होईल. साधारणतः मतमोजणी कामी 325 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
याशिवाय पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. सदर मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्र प्राप्त व्यक्तींना अधिकारी, कर्मचारी यांनाच प्रवेश असेल. सुरक्षा कामी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यानित्व आहेत. प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त 25 मतमोजणी प्रतिनिधी या कामी नेमता येतील. याशिवाय कोणीही अनधिकृत व्यक्तींना मतमोजणी कक्षात प्रवेश असणार नाही. मतमोजणी केंद्राबाहेरील वाहतूक व्यवस्था पोलिसांकडून करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावरूनच ओळखपत्र तपासून पोलीस प्रवेश देतील. प्रसिद्धी माध्यमांसाठी बैठकीचे स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहे. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कामी सर्व उमेदवार, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी, उमेदवारांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार यांनी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *