सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची अहमदपूर व चाकूर उपविभागात छापेमारी, दारूबंदी कायद्याअंतर्गत 12 व्यक्ती विरोधात 10 गुन्हे दाखल

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची अहमदपूर व चाकूर उपविभागात छापेमारी, दारूबंदी कायद्याअंतर्गत 12 व्यक्ती विरोधात 10 गुन्हे दाखल

लातूर (एल.पी.उगीले) : अहमदपूर आणि चाकूर उपयोगाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी आपली धडाकेबाज मोहीम कायम ठेवत, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यात अवैध धंदेवाल्यांचे बस्तान उठवण्याचा जनु संकल्प केला आहे. सतत धाडसत्र टाकून अनेक गुन्हे दाखल केले आहेत. परवाच दारूबंदी कायद्याअंतर्गत बारा व्यक्तीच्या विरोधात दहा गुन्हे दाखल करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपविभाग चाकूर व अहमदपूर अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर व अहमदपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्फत चाकूर व अहमदपूर उपविभागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान दिनांक 19/02/2023 रोजी मद्य विक्रीवर निर्बंध असतानाही काही इसम देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत, अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने चाकूर व अहमदपूर तालुक्यात ठीक ठिकाणी छापेमारी करून देशीदारूची अवैध व विनापास, परवाना चोरटी विक्री व्यवसाय करीत असताना, देशी दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या दोन्ही तालुक्यातील एकूण 12 इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून देशी विदेशी दारूचा 02 लाख 84 हजार 110 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर छापे मारीत अहमदपूर व चाकूर येथील प्रत्येकी एक एक बार वर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अहमदपूर येथील छापा कारवाईत देशी-विदेशी मद्यासह लोखंडी हत्यार कोयता मिळून आल्याने तो ही जप्त करून भारतीय हत्यार कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.पोलीस ठाणे अहमदपूर, किनगाव, वाढवणा, चाकूर, रेनापुर, शिरूर आनंतपाळ या ठिकाणी खालील नमूद इसमाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. सुरेश कचरू वाघमारे,( वय 28 वर्ष, राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर),पांडुरंग बापूराव केंद्रे, (वय 60 वर्ष, राहणार रुद्रा हनुमान, जुने बस स्थानक जवळ अहमदपूर), संग्राम नामदेव कांबळे (,वय 34 वर्ष, राहणार इंदिरानगर, अहमदपूर),माधव भगवान कांबळे, (वय 32 वर्ष, राहणार जळकोट, सध्या राहणार यशवंत कॉलेजच्या समोर, अहमदपूर.), राम लिंबाजी पवार राम लिंबाजी पवार ,(वय 47 वर्ष, राहणार काळेगाव रोड ,इंदिरानगर अहमदपूर.),शाहरुख मकसूद शेख, (वय 23 वर्ष, राहणार मेहबूबनगर, अहमदपूर.), समद बाबू बागवान,(वय 42 वर्ष, राहणार किनगाव, तालुका अहमदपूर),माणिक सखाराम गुंडरे,( वय 53 वर्ष, राहणार वाढवणा, तालुका उदगीर.) संतोष पंढरी एकरूपे ,(वय 30 वर्ष, राहणार कोदळी, तालुका उदगीर.),राममूर्ती बुरा, (वय 40 वर्ष, राहणार चाकूर.),ज्ञानोबा पंडित पलमटे ,(वय 33 वर्ष, राहणार पाथरवाडी ,तालुका रेनापुर), मंगेश अनिल नामदेव, (वय 30 वर्ष, राहणार शिरूर आनंतपाळ) पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 19/02/2023 रोजी अहमदपूर व चाकूर तालुक्यात दिवसभर चाललेल्या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर व अहमदपूर चे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वातील चाकूर व अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी सदरची कामगिरी केली आहे.

About The Author