मतदार संघात विकासाची गंगा खेचुन आणली ती केवळ आपल्या मतामुळेच – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले): जनतेनी जनतेच्या सेवेसाठीच लोकप्रतिनिधीला निवडून दिलेले असते, मात्र कांहीं लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक नसून स्वतः कोणीतरी मोठा व्यक्ती आहे, असे समजून स्वतःच्या धुंदीत वागतात, म्हणून शेवटच्या घटकापर्यंत विकास निधी पोहोचत नाही. कुठलाही लोकप्रतिनिधी हा कोणी मोठा व्यक्ती नसून तो लोकांचा लोकसेवक असतो, म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सक्षमपणे व जबाबदारीने जनतेची कामे केली पाहिजेत. आपण मला निवडून दिलात, म्हणून मी आपल्या मतदार संघात विकासाची गंगा खेचुन आणली. ती केवळ आपल्या मतामुळेच असे रोखठोक मत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील तोगरी येथे महाशिवरात्री व ग्रामदैवत श्री कल्लेश्वर यात्रेनिमित्त पालखी सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील , माजी जि.प. सदस्य रमेश पाटील तोगरीकर, संजय पाटील तोगरीकर, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे, तोगरीच्या सरपंच अश्विनी गुरुस्थळे , महेश येरनाळे, बस्वराज म्हादा, कैलास पाटील , हावगीराव म्हादा, शिवमुर्ती संबाळे गुरुजी, उपसरपंच रवि काळाजी, पंडितराव पाटील, गंगाधर पाटील, घाळय्या स्वामी, शिवकुमार बाळकुंदे, मनोज म्हादा नागनाथ म्हादा, कल्लेश्वर मुस्तापुरे , शेख मस्तान, वैजनाथ बोंडगे, सतीश पाटील ,मंजुनाथ म्हादा, वीरशेट्टी संभाळे , दस्तगीर शेख, चाँदसाब आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, उदगीर जळकोट मतदार संघाचा विकास करताना मतदारसंघातील कुठले गाव आपल्यासाठी मायनस आहे किंवा प्लस आहे, हे न पाहता मी निवडून आल्यानंतर मतदार संघातील साडेतीन लाख लोकांचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणूनच काम केले, आपण सर्वांनी यापुढे विचार करून एक मताने जो कोणी व्यक्ती काम करेल त्याच्याच पाठीमागे आपण ठामपणे उभा रहावे असे आवाहन करुन उदगीर मतदार संघाचा मागील अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढला आहे.
मागील २ वर्षाच्या काळात, कोरोना सारख्या महामारीच्या काळातही शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी एकविस ते बावीस शे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेवुन मतदार संघाला प्रगतीपथावर घेवुन जाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात मतदार संघाची नवी ओळख निर्माण केली, व देशाच्या नकाशावर उदगीर शहराची एक साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण केली. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गोर गरीब व कष्टक-यांचे नेतृत्व ते करत असताना शहरात विविध समाजासाठी भवनची निर्मिती त्यामध्ये लिंगायत भवन, बौद्ध विहार, आण्णाभाऊ साठे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारत, पंचायत समितीची इमारत, तहसीलची इमारत, मुस्लीम शादीखाना, पाण्यासाठी वाटरग्रीड योजना, तिरु बँरेजेस, जळकोट उदगीर शहरात महापुरूषांचे पुतळे, मतदार संघाला जोडणारे सर्व मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गंत रस्त्यासह नागरिकांना विविध मूलभूत योजना आदीसह विविध विकासकामे केली आहेत. आपण सर्वांनी एकदा जावून पहावे, असे आवाहन करुन आपल्या तोगरी गावासाठी 2019- 20 मध्ये तोगरी येथील सभा मंडप बांधकामासाठी 10 लाख रुपये,मूलभूत सुविधा योजनेमधून 2020- 21 ला 15 लाख रुपये,जन सुविधा योजनेमधून स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक बसवण्याकरिता 5 लाख रुपये, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यासाठी 1 कोटी 22 लाख 17 हजार रुपये दिले, अल्पसंख्यांक विभागातुन शादीखाना सुधाण्याकरीता 15 लाख रुपये, मातोश्री योजनेतून तोगरी ते रावणगाव शिवरस्ता 36 लाख रुपये, नांदेड – बिदर रोड 1 किलोमीटर रस्त्यासाठी 24 लाख रुपये, नांदेड बिदर रोड ते वाघदरी या दीड किलोमीटरच्या शिवरस्त्यासाठी 36 लाख रुपये, रावणगाव बेलसकरगा रस्ता ते पाझर तलाव 1 किलोमीटरचा रस्ता 24 लाख रुपये, आमदार विकास निधी मधून तो गरी – उदगीर – गुरुनाळ संग्राम पडले यांच्या घरापासून ते उदगीर बिदर रस्त्यापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी, तोगरी ते अजनी रस्ता 20 लाख रुपये मंजुर केले आहेत तर सामाजिक न्याय विभागाकडून बुद्ध विहार बांधकामासाठी 20 लाखाचा निधी मंजूर असुन मी आमदार झाल्यापासुन तोगरी गावासाठी 3 कोटी 39 लाख 17 हजार रुपयाचा निधी दिला असल्याचे सांगून मंदिराच्या तीर्थक्षेत्र दर्जासाठी जिल्हा नियोजन कमिटीकडे प्रस्ताव तयार करुन पाठपुरावा करणार असल्याचेही आ.संजय बनसोडे यांनी उपस्थित ग्रामस्थसमोर सांगितले. यावेळी तोगरी गावातील ग्रामस्थासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.