ग्रामीण भागातील आरोग्य शिबिर जनतेसाठी लाख मोलाचे अड. प्रमोद बिरादार

ग्रामीण भागातील आरोग्य शिबिर जनतेसाठी लाख मोलाचे अड. प्रमोद बिरादार

जळकोट (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य शिबिरांच्या आयोजन करणे हे खऱ्या अर्थाने लोककल्याणाचे प्रतीक होय असे प्रतिपादन पत्रकार तथा विधीज्ञ प्रमोद बिरादार यांनी केले. तेजळकोट तालुक्यातील मोजे बेळसांगवी  येथे यशवंत प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निमित्त भव्य आरोग्य शिबीर,मोफत औषधी वाटप, उपचार, चष्मे वाटप व रक्तदान शिबिर संपन्न झाले.या शिबिरात परिसरातील सर्व स्तरातील ग्रामस्थ उपस्थित राहून शिबिरांचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. ओमप्रकाश कदम, डॉ.कल्पना कदम, डॉ.मयूर बिरादार (दंत रुगतज्ञ), डॉ. प्रशांत नवटके(मधुमेह तज्ञ),पत्रकार तथा विधिज्ञ प्रमोद बिरादार यांच्या हस्ते झाले. यावेळी संभाजी सेनेचे उदगीर तालुकाध्यक्ष गजानन तरवडे, तालुका संघटक शिवाजी हावरगे हे उपस्थित होते.या शिबिराला माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे ,माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुल केंद्रे, चंदन पाटील , मारुती पांडे संचालक डीसीसी बँक,कल्याण पाटील, वाढवण्याचे सरपंच नागेश थोटे,माजी पंचायत समिती सदस्य दत्ता बामणे, बालाजी काळे, पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, नायब तहसीलदार राजा खरात, जळकोट तलाठी आकाश पवार, विजयकुमार खेळगे आदींनी भेट देऊन शिबिराला शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना विधीतने प्रमोद बिरादार म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस कित्येक वेळा आजार अंगावर काढत असतो, आरोग्याचे महत्व माहीत असूनही, दैनंदिन जीवनातील धावपळ आणि सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या महागड्या वैद्यकीय सुविधा यांचा अभाव, यामुळे अनेक वेळा आपल्या आजाराकडे ते दुर्लक्ष करत असतात. अशा व्यक्तींसाठी अशा पद्धतीच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन म्हणजे वरदान होय. असे सांगितले.

या शिबिरामध्ये मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी चे नवीन श्रंगारे, रमेश लिंबशेटे यांनी केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी  यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत नकुरे पाटील व त्यांचे मित्र मंडळाने अथक परिश्रम घेतला.

About The Author