देवणीत येथे बारावी परीक्षा सुरळीत सुरू

देवणीत येथे बारावी परीक्षा सुरळीत सुरू

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार, दि. २१ फेब्रुवारीपासून बारावी बोर्ड परीक्षा घेण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी तालुक्यातील एकूण ५ केंद्रावर २०६६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.शहरातील विवेक वर्धिनी महाविद्यालयात ४७८ विद्यार्थी असून केंद्र संचालक म्हणून बसवराज पाटील हे काम पाहत आहेत. तर श्री योगेश्वरीदेवी उच्च माध्यमिक विद्यालयात ४८४ विद्यार्थी परीक्षा देत असून या ठिकाणी सतीश बिराजदार हे केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत. बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय वलांडी येथे ४६७ विद्यार्थी परीक्षा देत असून या ठिकाणी आनंदे बी. डी. हे केंद्र संचालक म्हणून काम पाहतआहेत. श्री महादेव उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव येथे ३३४ विद्यार्थी परीक्षा देत असून ए. एन. बंडगर हे केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत. तर उद्देश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, सावरगाव येथे ३०३ विद्यार्थी परीक्षा देत असून या ठिकाणी खुळे एन. एम. हे केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत. देवणी तालुक्यातील पाच केंद्राकरीता गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत, अशी माहिती सहाय्यक सहशिक्षक बस्वराज बिराजदार यांनी दिली.

About The Author