माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर,45 जणांनी केले रक्तदान
उदगीर (एल.पी.उगीले) : माहेर मॅटर्णीटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटर उदगीरच्या वतीने शिवजयंतीनिमित्त समाजसेवावृत्तीने कार्य करणाऱ्या हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे व ओम डायग्नोस्टीक सेंटरचे संचालक तथा कंन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉ.नितीन गोविंदराव गुरूडे यांनी रक्तदान शिबीर घेतले.
या रक्तदान शिबीरात ४५ जणांनी रक्तदान केले.या रक्तदान कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॕनियल बेन, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शशिकांत देशपांडे, उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.दत्तात्रय पवार, ओम डायग्नोस्टीक सेंटरचे संचालक तथा प्रसिद्ध समाजसेवी रेडिओलॉजिस्ट डॉ.नितीन गुरूडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर उपस्थित होते.
या शिबीराचे प्रास्तविक माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे यांनी केले. आपल्या माहेर मॅटरनिटी हॉस्पिटलच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती त्यांनी सांगितली.
यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी म्हणाले की, समाजसेवावृत्तीच्या प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ तथा वंध्यत्व निवारण सेंटरच्या कॉल्पोस्कोपी तज्ञ डाॅ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे या सर्वसामान्य महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी समाजसेवावृत्तीने वैद्यकिय क्षेत्रात निस्वार्थी भावनेने गेल्या अनेक वर्षांपासून सतत कार्यरत आहेत. त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातील मोठ्या पदव्या चांगल्या गुणांनी ऊर्तीण होऊन आपल्या उच्च शिक्षणाचा लाभ सर्वसामान्य गोरगरिब, गरजवंत महिलांना, लोकांना व्हावा. यासाठीच माहेर मॕटर्निटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटरच्या व ओम डायग्नोस्टीक सेंटरच्या माध्यमातून निस्वार्थी पणे कार्य करतात.यासाठी डॉ.प्राजक्ता नितीन गुडे-गुरूडे यांचे पती समाजसेवावृत्तीने ओम डायग्नोस्टीक सेंटरचे संचालक रेडिओलॉजिस्ट डॉ.नितीन गुरूडे यांचाही सिंहाचा वाटा आहे. शिबिराचे सुत्रसंचालन मालोदे यांनी केले.
रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी माहेर मॕटर्निटी हॉस्पिटलचे कर्मचारी रणकुमार, सचिन, सौ.वंदना, सौ.वर्षा, कु.सोनाली, सौ.योगिता, स्वप्नील, बबलू, चंद्रशेखर, सौ.वैशाली, सौ.रोहिणी, म.मेघा, सर्व महिला, पुरूष कर्मचारी वर्ग, नसेर्स यांनी विशेष प्रयत्न केले.