राहुल केंद्रे यांच्यासह सर्व 26 जणांची निर्दोष मुक्तता
उदगीर (एल.पी.उगीले) : दिनांक 9 ऑगस्ट 2009 रोजी शेतकऱ्यांच्या कृषी मालाला भाव मिळावा व अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र भाजप तर्फे राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्यात येत होते.उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा नियोजित मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आला, त्यावेळी तिथे भारतीय जनता पार्टीच्या विविध मान्यवरांची भाषणे झाली. भाषणे चालू असताना आंदोलक लोकांमधून सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांकडून त्याला मज्जाव करण्यात आला. त्यावेळी काही पोलीस कर्मचारी व जमावातील आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. जमावातील लोकांकडून दगडफेक झाली, व त्यामध्ये एक रायफल व सरकारी गाडीचे अंदाजे दहा हजार रुपये चे नुकसान झाले. याच आंदोलनात राहुल केंद्रे यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती.
तत्कालीन राजकीय परिस्थिती व राज्यकर्ते यांच्या मुळेच आंदोलनकर्त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले होते.या घटनेवरून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 56/2009 कलम143, 147, 148, 149, 332,353,294,186,187,188 व 427 भा.द.वि.अन्वये व कलम 135 मुंबई पोलीस अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी क्रमांक एक राहुल केंद्रे व इतर यामध्ये तत्कालीन भाजपा तालुका अध्यक्ष मनोहर भंडे, तत्कालीन भाजयुमो शहराध्यक्ष राहुल आंबेसंगे, माजी तालुकाध्यक्ष रोहिदास गंभीरे,प्रदीप चौधरी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मामा पाटील, बाबुराव बिरादार, एकनाथ गोजेगावे, विष्णू तोंडारे, पद्माकर भुसनवाड, सतीश केंद्रे, रामराव काचले, तुकाराम घुगे, राम भांगे, भानुदास रनक्षेत्रे, संभाजी फड, ज्ञानेश्वर केंद्रे, जगदीश इंगळे, अंगद घुगे, शेरखान पठाण, बालाजी कवठाळे, शिवाजी वाघमारे, महादेव बोईनवाड,सोमनाथ बिरादार,व्यंकट घुगे व मयत सुरेश तेलंग आदी सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
सरकार पक्षातून या प्रकरणात पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, वैद्यकीय अधिकारी असे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने पुराव्यानिशी केस सिद्ध केली नसल्यामुळे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. डी.सुभेदार यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या बाजूने विधीज्ञ विनायक केंद्रे यांनी काम पाहिले, त्यांना ऍड.धीरज केंद्रे व ऍड. सचिन सारसर यांनी सहकार्य केले.