विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी

विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये “सुजान पालक, सदृढ बालक” या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत o ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी घेण्यात येत असून दिनांक 20 – 2 – 2023 या तारखेपासून आरोग्य विभागाचे डॉ. बी.बी सूर्यवंशी (वैद्यकीय अधिकारी), जी.आर मोमले (औषध निर्माता अधिकारी),ए.एस चौधरी (परिचारिका) यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी चालू आहे. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड,कलाशिक्षक एन.आर जवळे,ज्येष्ठ शिक्षक पी.जी काळे,परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!