सुमठाणा परिसरातून अवैध दारू विक्रेता चतुर्भुज

सुमठाणा परिसरातून अवैध दारू विक्रेता चतुर्भुज

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील चांदेगाव पाटी ते सुमठाणा जाणाऱ्या रस्त्यावर सतत अवैध दारू विक्री करून, पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या अवैध दारू विक्री करणाऱ्या सिद्धेश्वर उर्फ प्रशांत विलास सुतार (वय 32 वर्ष रा. कोदळी ता. उदगीर) याच्याविरुद्ध या परिसरातील नागरिकांच्या सतत तक्रारी होत्या. या भागातील महिला अवैध दारू विक्रीच्या विरोधात त्रासलेल्या होत्या. पोलीस प्रशासनाने वेळोवेळी या आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र सतत तो पोलिसांना झुंगारा देत होता. मात्र पाळत ठेवून वाढवणा पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून त्यास चतुर्भुज केले आहे.

पाळत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातील पोलीस नायक इकराम बशीरसाब उजेडे आणि तपासी अमालदार शिवाजी सोनवणे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास पकडून त्याच्या विरुद्ध पोलीस नाईक इकराम उजेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.न. 32/23 कलम 65 (अ) (इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपीने विना पास परवाना देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीचे कागदी लेबल असलेल्या काचेच्या 180 एम एल च्या 15 बॉटल्स प्रति बॉटल सत्तर रुपये प्रमाणे किंमत 1050 रुपये व एक निळी डिस्कवर मोटरसायकल एम एच 03/ B U 0741 जुनी वापरात असलेली अंदाजे किंमत 17 हजार रुपये. असे एकूण 18050 रुपयांचा यवज वाढवणा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अशा पद्धतीची चोरटी व अवैध देशी, विदेशी दारू, हातभट्टीची दारू याच्याविरुद्ध कठोर भूमिका घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार इकराम उजेडे , तपासीक आमलदार शिवाजी सोनवणे हे अधिक तपास करत आहेत.

About The Author