प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुजू झालेल्या डॉक्टर नर्गिस तांबोळी यांचे शाळेच्या वतीने सत्कार

प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुजू झालेल्या डॉक्टर नर्गिस तांबोळी यांचे शाळेच्या वतीने सत्कार

वाढवणा बु.(हुकूमत शेख) प्राथमिक आरोग्य केंद्रातील चार महिन्या पूर्वी महिला डॉक्टरची बदली झालेल्या जागी डी. एच. ओ. वडगावे यांनी आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरचीच नियुक्ती केल्याने वडगावे यांचे देखील गावाकऱ्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात महिला डॉक्टरची जास्त आवश्यकता भासते याची जाण ठेवून डी एच ओ यांनी होतकरू, हुशार डॉ. नर्गिस ज्या लहान वयापासूनच स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात प्रथम येणाचा मान मिळवणारी, 300 पैकी 300 गुण मिळवणारी एकदम हुशार डॉक्टरची प्रथम नियुक्ती आदेश डी. एच. वो. वडगावे यांच्या स्वाक्षरीनिशी डॉ. नर्गिस तांबोळी यांना देण्यात आली. डॉ. तांबोळी यांनी 20 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभार स्वीकारला या अनुषंगाने योगायोग असा की जि.प.के. प्रा. शा. वाढवणा ( बु ) चे मुख्याध्यापक तांबोळी जे.ए. यांची सुकन्या कुमारी डॉ . नर्गीस जाकीर तांबोळी यांची जि.प.लातूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणा ( बु ) येथे वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर नियुक्ती झाली असून त्यांचे केंद्रीय प्राथमिक शाळा वाढवणा ( बु ) च्या वतीने 21फेब्रुवारी रोजी शाल, श्रीफल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष पठाण, तरवडे, पत्रकार हुकुमत शेख यांची उपस्थित होती.

यावेळी डॉ . नर्गीस यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, मी पण एका जि. प. प्रशाला जळकोट येथे शिक्षण पूर्ण केले. माझे आई वडील पण शिक्षक आहेत. लहान वयापासून मला सर्व शिक्षकांचे संस्कार घडले. तुम्ही सर्व मुलांनी खूप अभ्यास करून गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करा. मी बारा बारा तास अभ्यास केला, तुम्ही पण थोडा थोडा वेळ सवय लागे पर्यंत दोन तास, तिन तास असा वेळ वाढवत जा. तुम्हाला पण सवय लागेल, आवड निर्माण होईल. व नक्कीच एक दिवस यश येईल, यात शंका नाही .आज या शाळेमध्ये असलेले माझे वडील व मला शिकवलेले देमगुंडे सर यांचे पण खूप श्रेय आहेत. स्पर्धा परिक्षा इयता चौथी स्कॉलशीप होल्डर होण्यासाठी मला देमगुंडे सर, माझे आई,वडील यांचे खूप मोठे योगदान होते .या वेळी सर्वाना एकच सांगू इच्छिते की, तुम्ही खूप अभ्यास करा, यशस्वी व्हा. आज मला या ठिकाणी बोलावून माझा सत्कार केलात त्याबदल मी सर्वाचे आभार व्यक्त करते. डॉक्टर म्हणुन तुमची सेवा इमाने इतबारे करेन तुमच्या जवळच्या, शेजारच्या सर्वांना सांगा डॉ. नर्गिस ही तुमचीच मुलगी आहे. तुम्ही केव्हा ही रुग्णालयात रुग्णाला घेउन या, रुग्णांची सेवा करिन अशी ग्वाही कुमारी डॉ. नर्गिस तांबोळी यांनी छोटेखाणी मनोगत व्यक्त करताना, आपली भावना विध्यार्थ्यासमोर व्यक्त केली. या वेळी शाळेतील श्रीमती इजारे ताई, श्रीमती रेणापूरे ताई, धुप्पे सर,गर्जे,वाकळे, सर्व शिक्षकांच्या व विध्यार्थ्यांच्या वतीने डॉ . कुमारी नर्गीस तांबोळी यांना पुढील वैद्यकीय कार्य सतत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक देमगुंडे यांनी केले,अभार शिक्षक धुप्पे यांनी मानले.

About The Author