रोटरी क्लबच्या वतीने मुलींना मोफत सायकल वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे हाळणी येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवी आठवीच्या नऊ मुलींना सावित्रीच्या लेकी उपक्रम अंतर्गत रोटरी क्लब अहमदपूर व हाळणी गावचे ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट सचिन करकनाळे यांच्या संयुक्त विद्यमाने मा.मंत्री मा. विनायकराव पाटील यांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आले.यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे मा.प्रांतपाल डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चितांबर कामटेवाड ,रोटरी क्लबचे मार्गदर्शक महेंद्र खंडागळे,रोटरी अध्यक्ष जीवन कापसे,सचिव कपिल बिरादार, निळकंठ होनराव, रामभाऊ बेल्लाळे, एडवोकेट किशोर कोरे , राजू खंदाडे, मोहिब कादरी, द मा माने, नरसिंग चिलकावार , शिवशंकर पाटील, भरत इगे, प्रशांत घाटोळ , धनंजय कोत्तावार , प्रकाश देशमुख, गोपाळ पटेल , श्रीराम कलमे , विश्वनाथ विळेगावे, प्रा अनिल चवळे , कमलाकर सुडे, श्रीधर लोहारे , रवीकुमार पूणे , राहुल घाटोळ, नजीब पठाण, मनोज आरदवाड, पांडूरंग गरुड, सोमकांत फफागीरे, जगन्नाथ वाघमारे, दिलीप सुरकुटे, अभिजीत करकनाळे, शाळेचे मुख्याध्यापक शेळके सर शाळेतील सर्व शिक्षक,गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी विनायकराव पाटील म्हणाले की रोटरी ही जगातील एकमेव स्वतः पैसे खर्च करून समाजसेवा करणारी संस्था आहे. रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने मागील अनेक वर्षात तालुक्यामध्ये समाज उपयोगी व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून कार्य केले आहे. जिल्हा परिषद शाळेतील खेड्यातील मुलींना मोफत सायकली वाटप हा एक रोटरीचा उल्लेखनीय उपक्रम आहे. या गावचे सुपुत्र सचिन करकनाळे यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सायकली देणे यासाठी पुढाकार घेतला ही बाब उल्लेखनीय आहे. सर्व रोटरी सभासदांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपोळे, महेंद्र खंडागळे यांनी रोटरी च्या जगभरातील कार्याचा आढावा मांडला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव.रो. कपिल बिरादार, सूत्रसंचालन रो.अनिल चवळे यांनी तर आभार सचिन करकनाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब हाळणी गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.