ग्राहक संरक्षण समितीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष बिरादार, महिला उपाध्यक्षपदी सौ. नेत्रगावे

ग्राहक संरक्षण समितीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष बिरादार, महिला उपाध्यक्षपदी सौ. नेत्रगावे

उदगीर (एल. पी. उगीले) : ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी, तसेच ग्राहक जनजागृती करण्यासाठी स्थानिक पातळीवर समितीचे गठन करून त्या समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या, प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी संतोषभाऊ तुकाराम बिरादार यांची तर महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. संगीताताई दीपक नेत्रगावे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती लातूर जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. संतोषभाऊ बिरादार आणि संगीताताई नेत्रगावे पाटील यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन करण्यात आली आहे. प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे संघटन महामंत्री निपुण शेंडगे यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्ती कार्यक्रमात पॅंथर युवा सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गायकवाड शीलरत्न नवनाथ हे उपस्थित होते. उदगीर शहरातील सामाजिक उपक्रमात सतत अग्रेसिव्ह राहणारे संतोषभाऊ बिराजदार आणि संगीताताई नेत्रगावे पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author