पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू हिंगमिरे यांना या महिन्याचे बेस्ट डिटेक्शन अवार्ड

पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू हिंगमिरे यांना या महिन्याचे बेस्ट डिटेक्शन अवार्ड

उदगिर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे स्वतः पुरस्कार देऊन गौरव करतात. या महिन्याचे उत्कृष्ट तपास काम केल्याबद्दल कासार शिरशी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू हिंगमिरे यांना गौरविण्यात आले आहे. कासार शिरशी पोलीस स्टेशन येथे गु.र.न.2/23,गु.र.न.16/23,गु.र.न.21/23,गु.र.न.22/23 कलम 379 भारतीय दंड विधान संहिता अंतर्गत टावर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 11 लाख 64 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. यासाठी अतिशय परिश्रम घेऊन भरीव योगदान दिले आहे. सदरचे गुन्हे उघडकीस आणणे, ही बाब पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व आव्हानात्मक होती.

आपण केलेल्या अविश्रांत परिश्रमामुळेच हा गुन्हा उघडकीस आला असून त्यामुळे जनतेत पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, अशा पद्धतीच्या शुभेच्छा सह जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे. राजू हिंगमीरे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल उदगीर शहर व परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत असून राजू हिंगमिरे यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!