केंद्रेवाडी ग्रामपंचायतकडून शिवजयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथे आज रयतेचे राजे जणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटा ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर शिवव्याख्याते बाळूभाऊ भास्कर केंद्रे यांनी प्रकाश टाकला तसेच विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त शिक्षक भानुदास गुरुजी केंद्रे लाईनमन अशोक गोविंदराव केंद्रे यांनी केले यावेळी ग्रामपंचायत केंद्रेवाडीच्या सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे सदस्य इंद्राणीताई भानुदास केंद्रे पुष्पा प्रकाश केंद्रे भानुदास रंगनाथ केंद्रे तुकाराम मनोहर केंद्रे मयूर केंद्रे तसेच सर्वांचे प्रतिनिधी माजी सैनिक विश्वासराव केंद्रे लक्ष्मण नागरगोजे सिद्धेश्वर केंद्रे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विष्णुदास मोरे यांनी केले.
