युवकांनो छत्रपती सारखा इतिहास घडवा – प्रा.मारोती बुद्रुक पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) :स्वराज्याचे जनक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पात शहाच्या विरोधामध्ये झुंज देऊन सुराज्य निर्माण केले युवकांनो भ्रष्टाचार,कूटनीती, व्यभिचार बंद करण्यासाठी तुम्हीही इतिहास घडवा असे आवाहन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
शेकापूर येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने स्वराज्याच्या कुशीत रडतोय शहरांचा इतिहास या विषयावर बुद्रुक पाटील बोलत होते. यावेळी विचारपीठावर सरपंच उर्मिलाताई शेळगे,उपसरपंच संदीप हलकरे,चेअरमन बाळासाहेब नवाडे, व्हाईस चेअरमन मधुकरराव सावंत, ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे,माजी सरपंच शरदराव देशमुख,माजी चेअरमन सुधाकर सावंत,विठ्ठल शेळके व्यंकटराव व्याख्यानाचे आयोजक चाकूरच्या आयडियल कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक केशव मधुकरराव सावंत आदिची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना बुद्रुक पाटील म्हणाले कि छत्रपती शिवरायांचा इतिहास आम्हाला जगाला कळाला तो आम्हालाही जगता आला पाहिजे. आजची पिढी भौतिक सुखात अडकली आहे.त्यांच्यावरचे संस्कार कमी होत चाललेत इंटरनेटचे महाजाल घराभोवती घोंगावते.माणसातलं माणूसपण हिरावलय परत रामराज्य आणि शिवरायांचे सुराज्य आणण्याचा संकल्प युवकांनो तुम्हालाच करायचा आहे. छत्रपती शिवराय कोणाची जहांगीरी नाही छत्रपती शिवराय हे तमाम जनतेचे श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराजांना एक दिवस आठवण केली, महाराजांचा फोटो असलेला झेंडा बाईकवर लावला,गाडीचे सायलेंन्सर काढून फट फट करत, दारू पिऊन चिरकत, ओरडत गावभर फिरले,डॉल्बीच्या थिल्लर गाण्यावर नाचले,रात्री झेंडा कोठेतरी पडला झाली का जयंती,स्वराज्य एका दिवसात भेटले नाही,कित्येकांनी आहुत्या दिल्यात, शेकडो मावळ्यांचे रक्ताचे पाठ वाहिलेत, महाराजांनी किती दु:ख भोगले किती कष्ट केले,शिव चरित्र वाचा,जयंती करावी,पण चरित्र सांभाळून,मर्यादा ठेऊन,पारंपारिक, धार्मिक,समाजपयोगी कार्य करुन,शेतकरी राजा,कष्टकरी,दिन दुबळ्यांना मदतीचा हात देऊन,त्यांच्या हाताला स्वाभिमानाचा रोजगार देऊन, निराधार अनाथांना आधार देऊन,त्यांचे कष्ट दुर करुन, हेच तर केले महाराजांनी,आपल्या प्रजेची सेवा केली,ज्यांनी गुलाम बनवले त्यांचा अंत केला,गद्दारांना शिक्षा केली,महिलांचा सन्मान करताना स्वतःचा नातेवाईक असणारा राझांचा पाटील त्याचा चौरंग केला,शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका असे म्हणणारे राजे होते ,पुढच्या पिढीने टाईम पास व फँशन म्हणून शिवजयंती करायची का,छत्रपती हा विषय डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे.आपल्या मुलांना शिवचरित्र वाचायला द्या शिवरायासारखे आदर्श चारित्र्यसंपन्न घडवा,देव देश धर्माची शिकवण द्या समाजसेवक बनवा,भष्ट्राचार, अत्याचार,दुराचार या पासून दुर राहून कार्य करायला शिकवा उद्याचे महान भारतीय नागरिक बनावा..युवकांनो जिथे अन्याय दिसेल तिथे संघर्ष करा, आणि शिवचरित्र जीवनात उतरवा,महाराजांची किर्ती यश,महाराजांचा गनिमीकावा, महाराजांचे शौर्य, जिवन गाथा वाचण्याच्या संकल्पाची सुरुवात करा जयंती हा उत्सव आहे,याचे विद्रुपीकरण होणार नाही हा संकल्प आपण करा.
जगाला छत्रपती शिवाजी महाराज कळले आम्हाला कळणार का भारतीय घटना लिहिताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून भारतीय राज्यघटना लिहिल्याचे सांगितले. अशा महान छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे पारायण झाले पाहिजे असेही प्रा. बुद्रुक पाटील यांनी सांगितले.
यावेळी 25 युवकांनी व्याख्यान ऐकून आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याची करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श पुरस्कार शिक्षक किशन उगले सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती समितीचे अध्यक्ष संदीप सावंत,उपाध्यक्ष संदीप जाधव,कार्याध्यक्ष हरी सावंत,समितीचे सदस्य आनंद भागये, दत्ता शेलाळे,प्रसाद हलकरे,रामचंद्र सावंत आदिनी प्रयत्न केले.