महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : समाजाला शिक्षणाचे, आरोग्याचे, वैयक्तिक आणि स्वच्छतेचे तसेच विज्ञानाचे महत्त्व पटवून सांगणारे थोर संत गाडगेबाबा यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी भूषविले. तर यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश ससाणे, ह.भ. प. प्रो. डॉ.अनिल मुंढे, युवराज मोरे, वामनराव मलकापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली. तसेच अध्यक्षीय समारोपात डॉ. बब्रुवान मोरे यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या विचारांची आज संपूर्ण समाजाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author