सपोनी नौशाद पठाण उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

सपोनी नौशाद पठाण उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी जानेवारी महिन्यात धडाकेबाज कामगिरी करून अनेक गुन्हे होण्यापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाचा वचक निर्माण केला आहे. तसेच जनमानसाच्या मनामध्ये पोलिसाबद्दल आदराची भावना निर्माण केली आहे. या गोष्टीची दाखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नौशाद पठाण यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

तसेच वाढवणा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बालाजी आक्केमोड यांनी उत्कृष्ट पद्धतीने समन्स बजावणी करून चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही सन्मान जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीने करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण आणि पोलीस शिपाई बालाजी आक्केमोड यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल उदगीर तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!