विना मास्क कारवाई करताना नागरिकाने केले होते व्हिडिओ ट्वीट…
पुणे (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग वाढत चालल्याने शासकीय यंत्रनेवर मोठ्या प्रमाणावर तान आला आहे.त र वीणा मास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई सुरु आहे परंतु वाहतुक पोलीस कारवाई करताना स्वताच नियम धाब्यावर बसवत वीणा मास्क कारवाई करताना दिसुन येत आहे. वीणा मास्क कारवाई करणाऱ्या महिला वाहतुक ट्रॉफिक पोलिसाला चांगलेच महागात पडले. विश्रांतवाडी वाहतुक पोलीस विभागाकडुन कारवाई सुरु असताना एका नागरिकाला अड़वुन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला मात्र दंड वसुलीच्या नादात महिला पोलीस कर्मचार्या च्या तोंडाला मास्क लावलेला नव्हता यावेळी सजग नागरिकाने व्हिडिओ काढत महिला पोलिस कर्मचार्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठाना व्हिडिओ दाखवला परंतु वरिष्ठानी दाद न दिल्याने तो व्हिडिओ मुख्यमंत्री, पुणे पोलीस, आयुक्त पुणे महानगर पालिका, तत्कालीन गृहमंत्रणाट्वीट करत कारवाई ची मागणी केली होती. त्या ट्वीट ची दखल घेत अखेर वीणा मास्क कारवाई करणाऱ्या महिला कर्मचारी वंदना संजय आल्हाट यांच्याकडून 500 रुपये दंड वसुल करण्यात आल्याने पोलिसांन मध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.