संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी

संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपारिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी, दुर्गुण कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून टाकून होळीचा सण साजरा केला.होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात.यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच होळी सण साजरा करताना सामाजिक भान ठेवले जात नाही .पाणी वाया घालवले जाते. केमिकल मिश्रित रंग वापरून शारीरिक इजा पोहोचवली जाते. हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर सुसंस्कार व्हावेत यासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केली.यावेळी त्रिगुणा मोरगे मॅडमनी होळी सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, उद्धव शृंगारे, संजीवनी गुरमे, शबाना शेख,अश्विनी घोगरे, शारदा तिरुके, सविता पाटील, मीना तोवर,ज्योती जाधव, सोनाली पवार, आयोध्या जाधव, प्राजक्ता भोसले,मीना होनराव,सविता करंडे, अनिता बयास, सतीश साबणे, नंदकुमार मद्देवाड, युवराज मोरे, मंगेश शिवनखेडकर ,भानुदास माने, आदींची उपस्थिती होती.

About The Author