अहमदपूरात वीरशैव कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : या विश्वात सर्व देवतांच्या मध्ये महादेव हा सर्वश्रेष्ठ देव असल्याचे सांगून त्याची मनोभावे तपश्चर्या करून भक्ती केल्यास शरीराला चैतन्य आणि मनाला एक नवीन प्रेरणादायी ऊर्जा मिळते. असे आग्रही प्रतिपादन श्री. श्री. श्री. 1008 केदारनाथ रावल, जगद्गुरु, भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी,ओखीमठ, उत्तराखंड यांनी केले. ते दि. ५ मार्च रोजी वीरशैव मंगल कार्यालयाचे नगरोत्थान दलितोत्तर योजनेअंतर्गत नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे यांच्या स्थानिक विकास निधी 17 लक्ष रुपये खर्चून वीरशैव मंगल कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात आशीर्वचन प्रसंगी बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबासाहेब पाटील, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, पुष्पाताई लोहारे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, लक्ष्मीकांत कासनाळे, वीरशैव महासभेचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर चवंडा, शिवानी चवंडा, अभय मिरकले, रवी महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जगद्गुरु महास्वामीजी पुढे बोलताना म्हणाले की आत्मशांतीसाठी पूजा ,ध्यान, मनोभावे भक्ती आणि परमपिता महादेव मंदिराच्या जिर्णोदरासाठी महादेवाच्या परम भक्तांनी सढळ हाताने मदत करा. असे जाहीर आवाहन केले. कार्यक्रमाचा शुभारंभ जगद्गुरु महास्वामीजी यांच्या हस्ते फीत कापून वीरसेवक मंगल कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आला. प्रारंभी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे परिवाराच्या वतीने जगद्गुरु महास्वामीजी यांच्या पाद्य पूजनाच्या सोहळ्याने करण्यात आला. यावेळी बालाजी आगलावे पाटील, सांब महाजन, डॉक्टर अशोक सांगवीकर, डी बी लोहारे गुरुजी यांचे मनोगत पर भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप आमदार बाबासाहेब पाटील यांच्या भाषणाने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन कलावती भातंबरे यांनी तर आभार श्रीकांत शर्मा यांनी मानले. या सोहळ्याला शेखर देसाई, एडवोकेट अलीम सय्यद, बालाजी आगलावे, माजी उपसभापती बालाजी गुट्टे, माजी नगरसेवक चंदाताई उपाध्ये, शरण चवंडा, गुरुमाय कमलताई स्वामी, माधव पुणे, संगमेश्वर नीला, मंगलताई हामने यांच्यासह समाज बांधव महिला, भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश कासनाळे, राजू कोरे, रमेश कल्याणी, महादेव स्वामी, महादेव बोंडगे, राहुल वाडकर, संगम मेन कुदळे यांच्यासह मंगल कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.