कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेड तर्फे शेतकऱ्यांना हरभरा हमी भावाचा लाभ, खात्यात पैसे जमा
कमालनगर (एल.पी.उगीले) : सिमाभागातील शेतकऱ्यांचे जिवनमान सुधारावे व त्यांच्या आर्थिक वृध्दीच्या उद्देशाने या क्षेत्रातील अंकुश वाडीकर, प्रदीप बीरादार व बालाजी जाधव या उच्चशिक्षीत युवकांनी एकत्र येत कमालनगर येथे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली, व स्थापनेनंतर थोड्याच कालावधीत नाफेड चे शासकिय हमी भाव खरेदी केंद्राची मान्यता मिळवीली. या खरेदी केंद्रामुळे सिमाभागातील अनेक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता आला,त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावा पेक्षा अधिक भाव त्यांच्या उत्पादनाला मिळवुन देऊन शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेड चे संचालक ठरले आहेत. इतक्या कमी वेळात त्यांनी खरेदी केंद्राची सर्व कायदेशीर पूर्तता करुन केंद्र चालू केले, या खरेदी केंद्रा बद्दल जी शंका होती, ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याच्या उत्पादनाची रक्कम जमा झाल्यानंतर दुर झाली आहे व शेतकरी खूष झाले आहेत. भविष्यात अशाच प्रकारे इतर सर्व सुविधा शेतकऱ्यांना मिळवुन देण्याचा निर्धार कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेड च्या संचालक मंडळाचा असल्याचे अंकुशराव वाडेकर यांनी सांगितले. येणाऱ्या पेरणीच्या पार्श्वभुमिवर शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याचे कंपनीचे नियो़जन आहे. तरी सर्व सभासद शेतकऱ्यानी आपापल्या बियाणे व खता संबंधीत मागणी कार्यालयात नोंदवावी. व आवश्यक ती प्रक्रीया पुर्ण करावी. अशी विनंत्ती प्रदीप बिरादार यांच्याद्वारे करण्यात आली आहे.