संत धनाजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पालखी सोहळ्याची मिरवणूक

संत धनाजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पालखी सोहळ्याची मिरवणूक

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील नागलगाव येथे श्री संत धनाजी महाराज मठ संस्थानच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री संत धनाजी महाराज यांच्या 185 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या निमित्ताने श्री संत धनाजी महाराज यांच्या पालखीची गावातून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.या साप्ताहात दररोज हरिपाठ,भजन व कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला.श्री संत धनाजी महाराज यांच्या सप्ताहाची सांगता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोविंद महाराज चाकूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.गावातील प्रतिष्ठित शिक्षक राजकुमार रामचंद्र मोरखंडे यांच्या परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या महाप्रसादाचा गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला.यावेळी काशिनाथ आप्पा स्वामी ,नामदेवराव पिचारे ,बाबुराव पाटील, विठ्ठल चांदोबा पाटील ,बालाजी तेलंग ,राम पाटील ,ज्ञानोबा बिरादार, प्रेम वाडीकर ,राजकुमार बिरादार, मुकुंद पांचाळ ,मल्लिकार्जुन पांचाळ ,शिवाजी बिरादार, कुमार शेरे, रमाकांत शेरे, अजय बिरादार आदींनी परिश्रम घेतले.

About The Author