ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन मित्र मंडळाची मागणी

ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची जन परिवर्तन मित्र मंडळाची मागणी

उदगीर [एल.पी.उगीले ] : पवित्र रमजान ईद निमित्त उदगीर येथील ईदगाह मैदानावर ईद उल फित्र चा नमाज आदा करण्यासाठी मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने समाज बांधवांना नमाज आदा करताना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दरम्यान झालेल्या उष्माघाताचा गांभीर्याने विचार करून इदच्या नमाजच्या वेळी प्रार्थना करणाऱ्या भक्तावर त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये,या करिता संपूर्ण ईदगाह मैदानावर मंडप टाकण्याची मागणी जन परिवर्तन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शहरातील वराह (डुक्कर) या जनावरांवर पायबंद करणे व शहरातील मुस्लीम समाजाच्या सर्व स्मशान भूमीची साफसफाई करण्याची ही मागणी उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे जन परिवर्तन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अझरोद्दीन शमशोद्दीन शेख व सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मुंतजीब खाजा साहब, अजहर आयुब शेख , सय्यद मौला,पठाण आमिर, शेख वासेख, शेख अझर, शेख अल्ताफ, उस्ताद वाजिद, शेख अस्लम, शेख उमर यांनी केली आहे.

About The Author