इनरव्हील क्लबचे “ग्रंथालय” हे आधिकारी घडवण्याबरोबर माणूसपण निर्माण करणारे संस्कार केंद्र व्हावे ~प्रा बिभीषण मद्देवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लबने पर्यावरण रक्षण , शालेय साहित्य वाटप , तोंडार व लोणी परिसरातील वस्तीत सौर उर्जेवर चालणारे लाईट बसवुन तेथिल नागरीकांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला. त्याच प्रमाणे तोंडचीर गावात तयार केलेल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून आधिकारी घडवण्याबरोबरच माणूसपण निर्माण करणारे केंद्र व्हावे. असे प्रतिपादन उद्घाटक प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले. ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इनरव्हील क्लबच्या वतीने निर्माण केलेल्या ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यापपीठावर सरपंच सुनीता पाटील, सुदर्शन पाटील ,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीरा चंबुले, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, एडिटर पल्लवी मुक्कावार, सी सी अश्विनी देशमुख, सदस्य नेहा जैन, तोंडचिरच्या उपसरपंच लताताई जाधव,माजी सरपंच देवेंद्र अप्पा चिल्लरगे, मारोती जाधव, मारोती भंडारे, ग्रामपंचायत सदस्य सुकूमारबाई कांबळे,भागिरथीबाई जाधव, लूब्जाबाई भुताळे , तानाजी भोसले , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चामे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा. मद्देवाड म्हणाले की, इनरव्हीलच्या ग्रंथालयांच्या माध्यमातून गावातील तरुणांनी एकत्र यावे. स्पर्धा परिक्षेची तयारी करावी.मोठ्या मुलांनी लहान विद्यार्थ्यांना दररोज मार्गदर्शन करावे, व इनरव्हील क्लबचा उपक्रम सार्थकी लावावा. सामाजिक जाणीव जपण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ने स्थापन केलेले ग्रंथालय हे प्रेरणादायी ठरावे, परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेऊन प्रबोधनाचा पाया रचावा, असेही सांगितले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. आश्विनी देशमुख यांनी केले तर आभार स्वाती गुरुडे यांनी मानले.