मातृभूमी नर्सिंग स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम !
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथिल मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्बारा संचलित मातृभूमी नर्सिंग स्कूलचा १००% निकाल लागला असुन ४२% विद्यार्थ्यांने विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे, तर प्रथम श्रेणीत ५८% विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मातृभूमी नर्सिंग स्कूल ए एन एम मध्ये पवार काजल 85.75% , कांबळे मयुरी बंडू 83.25% , गायकवाड प्रतिक्षा संतोष 83% यांनी उल्लेखनीय असे यश प्राप्त केले आहे. पवार काजल उत्तम ( प्रथम) ,कांबळे मयुरी बंडू ( द्वितीय )गायकवाड प्रतीक्षा संतोष( तृतीय) येण्याचा मान यांनी पटकावले आहे .तसेच गायकवाड नागमणी राजकुमार, गायकवाड तन्वी नारायण,जाधव वर्षा नवनाथ , कांबळे सपना करण, सूर्यवंशी नूतन प्रभुदास , सूर्यवंशी दीक्षा यशवंत, सूर्यवंशी अश्विनी संजय या विद्यार्थीनी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाल्या आहेत , मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यासाठी रेग्युलर तासिका ,साप्ताहिक घटक निहाय चाचणी ,पोस्टींग यामुळे शिक्षण संपल्या बरोबर नौकरीची संधी उपलब्ध होत आहे .यामुळे दर्जेदार शिक्षण मातृभूमीतून मिळत असल्याने विद्यार्थी व पालक समाधान व्यक्त करत आहेत. नर्सिंगच्या उज्वल यशाबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतिश उस्तुरे , प्राचार्या उषा कुलकर्णी , रणक्षेत्रे ,ग्रंथपाल उषा सताळकर आदींनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.