रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या अध्यक्षपदी मंगला विश्वनाथे, सचिवपदी सरस्वती चौधरी
उदगीर (एल.पी.उगीले.) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या सन २०२३-२४ या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी मंगला विश्वनाथे यांची तर सचिवपदी सरस्वती चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी प्रशांत मांगुळकर, सहसचिवपदी डॉ. सुधीर जाधव, कोषाध्यक्षपदी ज्योती चौधरी, क्लब ट्रेनरपदी किशोर पंदीलवार आदींची निवड करण्यात आली आहे. इतर कार्यकारिणीमध्ये मेंबरशिप डायरेक्टर संतोष फुलारी, रोटरी फाऊंडेशन डायरेक्टर विजयकुमार पारसेवार, क्लब सर्व्हिसेस अन्नपूर्णा मुस्तादर, सेवाप्रकल्प संचालक डॉ. बाळासाहेब पाटील, अनिल मुळे व मिलिंद मुक्कावार,पब्लिक इमेज डायरेक्टर रविंद्र हसरगुंडे, इंटरनॅशनल सर्विस डायरेक्टर चंद्रकांत ममदापुरे, परिवर्तन स्पेशल प्रोजेक्ट डायरेक्टर विशाल जैन, युथ सर्व्हिस डायरेक्टर अँड. विक्रम संकाये, डीईआय डायरेक्टर प्रमोद शेटकार,पर्यावरण विभाग चेअरमन भागवत केंद्रे, डिस्ट्रिक्ट एम्फसिस डायरेक्टर डॉ. मोहन वाघमारे, लिटरसी डायरेक्टर सुयश बिरादार, आर.आय. एम्फसिस डायरेक्टर डॉ. सुनिता चवळे, होकेशनल सर्विस डायरेक्टर गजानन चिद्रेवार, स्पोर्ट्स प्रमोशन डायरेक्टर आशिष अंबरखाने, सांस्कृतिक डायरेक्टर बिपीन पाटील, आयटी मीडिया अँड वेबसाईट डायरेक्टर विशाल तोंडचिरकर, पल्स पोलिओ डायरेक्टर कीर्ती कांबळे, लसीकरण विभाग डायरेक्टर गोपाळ मनियार, बुलेटीन चेअरमन अॅड. मंगेश साबणे, महिला सशक्तीकरण प्रमुख महानंदा सोनटक्के, विन्स चेअरमन डॉ. सुलोचना येरोळकर,फेलोशिप डायरेक्टर सुनीता मदनुरे, नागेश आंबेगावे, आयपीपी रामेश्वर निटूरे व सार्जंट अॅट आर्म पदी विद्या पांढरे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्रअभिनंदन होत आहे.
रोटरी क्लब ऑफ उदगीरचा नेहमीच आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन तसेच शहराच्या विकास कामात बहुमोल वाटा राहिलेला आहे. रोटरी क्लब ही जागतिक संस्था आपल्या उपक्रमातुन सामाजिक व राष्ट्राप्रती असलेली बांधिलकी जपते. यावर्षी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रांतपाल रो. स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर भरगच्च असे विविध स्तरावरील उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीने जलसंवर्धन व वृक्ष लागवड, शाळेच्या विद्यार्थ्यांची डोळे तपासणी व मोफत चष्मे, दिव्यांगासाठी उपक्रम, ग्रामीण भागात शाश्वत शेती विकास प्रकल्प यासह महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रमाचे नियोजन करून पुर्णत्वास नेण्याचा मानस असल्याचे रोटरीच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे यांनी सांगितले.