बिर्ला इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी उत्साहात साजरी

बिर्ला इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

आषाढी एकादशी चे औचित्य साधून दि. 28 जून रोजी शाळेतील प्री‌-प्रायमरी पासून ते 10 वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून आपला सहभाग नोंदवला होता. त्यानंतर शाळेतील संगीत शिक्षक कृष्णा कुलकर्णी यांनी मुलांना शिकवलेले वारकरी पाऊले खेळत सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडीची सुरूवात करून दिंडीत फुगडी सहित आनंद घेतला. दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत मुक्ताबाई, संत गोरोबा कुंभार विद्यार्थी या वेशभूषेत येऊन त्यांना दिंडीची शोभा वाढवली. पालखी स्थळ उभे करून पालखी पोहचल्यानंतर मुलांनी सुंदर माऊली माऊली गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. अगदी भक्तीमय वातावरणात दिंडी उत्साहात साजरी झाली. दिंडी झाल्यानंतर शाळेचे प्राचार्य अनिल पॉल यांच्या हस्ते पुजा आणि महाआरती करण्यात आली. व सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्वच शिक्षक तथा शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author