मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हेलेन केलर यांची जयंती

मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हेलेन केलर यांची जयंती

लातूर (प्रतिनिधी) : विशालनगर परिसरातील साई मंदिरासमोरील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हेलेन केलर जयंती साजरी करण्यात आली.या वेळी श्रीकृष्ण लाटे,शाळेच्या प्राचार्य सुमेरा शेख यांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या शिक्षिका कीर्ती पाटील यांनी हेलेन केलर यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.सुप्रसिद्ध लेखिका.एक सुधारक.समाजवादी आणि विलक्षण असे व्यक्तिमत्व म्हणून डॉ.हेलेन केलर यांची प्रचिती होती.जागतिक पातळीवर प्रथम मूकबधिर पदवीधारक व्यक्ती म्हणून डॉ हेलेन केलर याच्याकडे पाहिले जाते. दिव्यांग्यासाठीच्या यादीतील मानबिंदू आणि महिलांच्या हितचिंतक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतली जाते.हेलेन केलर यांच्या बालपणाची माहिती देऊन त्यांच्या समाजसेवेचे कार्य आणि जनजागृती याविषयी माहिती दिली याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी हेलेन केलर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले ग्राम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका ममता शर्मा यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका व शिक्षतेवर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author