महात्मा फुले महाविद्यालयातील ‘यचममु ‘विद्यापीठ केंद्रातून गणेश चव्हाण सेट परीक्षा उत्तीर्ण

महात्मा फुले महाविद्यालयातील 'यचममु 'विद्यापीठ केंद्रातून गणेश चव्हाण सेट परीक्षा उत्तीर्ण

अहमदपूर ( गोविंद काळे)
तालुक्यातील सांगवी तांडा येथील रहिवासी, महात्मा फुले महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी गणेश गुलाब चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या मराठी विषयातील सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश गुलाब चव्हाण हे सध्या शासकीय मुलांची निवासी आश्रमशाळा, मरशिवणी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून, ते येथील महात्मा फुले महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए. मराठी वर्गात शिक्षण घेत आहेत. एम. ए. द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्राची परीक्षा त्यांनी दिली आहे. सेट परीक्षे साठी त्यांना संमंत्रक डॉ. अनिल मुंढे, डॉ.मारोती कसाब बाळासाहेब कराड यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी दिलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, केंद्र संयोजक डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील, मराठी विषयाचे संमत्रक डॉ. मारोती कसाब, प्रा. बाळासाहेब कराड यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author