बदलत्या काळानुसार ग्रंथालय बदलली पाहिजेत – डॉ. सुधीर जगताप

बदलत्या काळानुसार ग्रंथालय बदलली पाहिजेत - डॉ. सुधीर जगताप

उदगीर (एल.पी.उगीले) : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. आज माहिती व तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक ग्रंथालयाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना मोठ्या प्रमाणात समाजात रूढ होत आहे. त्यामुळे त्याचा प्रसार आणि प्रचार होणे ही काळाची गरज आहे. ई- ग्रंथालय कसे वापरावे, त्याचा फायदा काय? याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. ई-पुस्तके, ई- जर्नल्स, ई- पेपर आज सर्वत्र उपलब्ध आहेत.त्याचा वापर ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. संशोधन कार्यात या ई-ग्रंथालयाचा वापर होताना आपणास दिसतो. विद्यार्थ्यांना आपल्या विषयानुसार ई- पुस्तके निवडता येतात, आणि ते संग्रहित करता येतात. पूर्वी पारंपारिक असलेले ग्रंथालय हे आत्ता हळूहळू आधुनिक ई-ग्रंथालयात बदलत आहेत. त्यामुळे ग्रंथालयात उपलब्ध असलेली सेवा सहज विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांनी केले. ते एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन सत्रातील अध्यक्षीय समारोपात बोलत होते.

येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या मार्फत एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी गुलबर्गा विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. सुरेश जंगे, अन्नामलाई विद्यापीठ चेन्नई येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सादिक बच्चा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इंग्रजी विषयाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहिदास नितोंडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील ग्रंथपाल डॉ. जगदीश कुलकर्णी, कर्नाटक पशुवैद्यकीय व मत्स्यपालन शास्त्र विद्यापीठ बिदर येथील ग्रंथपाल डॉ. यु. एस. जाधव, परिषदेचे संयोजक डॉ.शेषनारायण जाधव, सह-संयोजक प्रा.अमर तांदळे, आयक्यूएसी विभागाचे डॉ. धनंजय गोंड, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड, जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय हट्टे, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य मनोरमा शास्त्री, जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या व्यवस्थापक ज्योती स्वामी, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती तारे इ. उपस्थित होते.

सदरील राष्ट्रीय परिषद ही ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही स्वरूपात एकूण चार सत्रांमध्ये संपन्न झाली. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुरेश जंगे यांनी दुसऱ्या सत्रात उपस्थिताना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की, ग्रंथपालांना आपल्या कार्याची आवड असली पाहिजे, कारण ग्रंथालय चांगले असले की कॉलेज चांगले असा एक समज आपल्यात आहे. प्रत्येक ग्रंथपालांनी स्वतःमध्ये बदल करून आज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ई ग्रंथालयाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. सर्वच कॉलेजमधील ग्रंथालयात सुविधा आहेत असे नाही. पण किमान मूलभूत सुविधेवर देखील आपण ई ग्रंथालय चालू शकतो, तशी सुविधा विद्यार्थ्यांना देऊ शकतो. याचा विचार प्रत्येक ग्रंथपालाने करणे आवश्यक आहे.आज ग्रंथालयात कॉम्प्युटर,इंटरनेट, वीज अत्यंत आवश्यक आहे.त्यामूळे ई -पुस्तके, ई-जर्नल्स, ई- न्यूज पेपर ची सुविधा तसेच विषयानुसार ई-बुक उपलब्ध करून देता येतात.असे ही ते म्हणाले.

या राष्ट्रीय परिषदेचे तिसरे सत्र हे झूम या आभासी व्यासपीठावर घेण्यात आले. यात अन्नामलाई विद्यापीठ चेन्नई येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सादिक बच्चा यांनी “ई-रिसोर्स: पब्लिकेशन टेक्निक इन इंडेक्स जर्नल्स” या विषयावर मार्गदर्शन केले. तर परिषेदेचे चौथे समारोप व प्रमाणपत्र वितरण सत्रात कर्नाटक पशुवैद्यकीय व मत्स्यपालन शास्त्र विद्यापीठ बिदर येथील ग्रंथपाल डॉ. यु. एस. जाधव यांनी “महिती व तंत्रज्ञानाचा पारंपरिक ग्रंथालयाच्या सेवा व स्त्रोतावर पडलेला प्रभाव”या विषयावर आपले मत मांडले.

या राष्ट्रीय परिषदेला डॉ.विष्णू पवार, डॉ.लक्ष्मीकांत पेनसलवार, डॉ. मारोती जाधव, डॉ. शैलेश गडलवार, राजू वाघमारे, गणेश घाटोळे यांच्यासह कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलगणा, पंजाब, तामिळनाडू तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षक, ग्रंथपाल, विद्यार्थी ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते.या राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक डॉ. शेषनारायण जाधव तर सूत्रसंचालन डॉ.धनजय गौंड यांनी केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. अमर तांदळे, प्रा. राहुल पुंडगे प्रा. ऋतुजा दिग्रसकर, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. रशीद दायमी, राखी शिंदे, प्रा. आसिफ दायमी, , प्रा.उषा गायकवाड, शकुंतला सोनकांबळे, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, महेश हुलसुरे, सादिक शेख, अमोल मसुरे, नरसिंग जानके, सोमनाथ झरकुंटे, इ. परिश्रम घेतले.

About The Author