शाहू महाराजांच्या विचाराची युवा पिढी सह देशाला गरज..!! – डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे ) देशात आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम मांडून ती प्रत्यक्षात आपल्या राज्यात राबवून उपेक्षितांना प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केले.स्वातंत्र्या नंतर या कार्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मूर्त रुप दिले. या दोन महामानवांनी उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन फुलविले असून याच परिवर्तनवादी विचारांची युवा पिढी सह देशाला खरी गरज आहे असे प्रतिपादन युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
शहरातील सिद्धार्थ कॉलनी येथील संस्कार बुद्ध विहार येथे आयोजित छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष एड. अमित भैया रेड्डी, जिल्हा संघटक एम एन क्षिरसागर,तालुका सरचिटणीस वैजनाथ सुरवसे, कोषाध्यक्ष सुभाष साबळे ,संस्कार सचिव बी.जी.दुगाणे, तालुका संघटक एल.डी.कांबळे,वाय.डी. वाघमारे, प्रचार व पर्यटनचे सचिव विठ्ठलराव गायकवाड रा.सू.कांबळे बाबासाहेब कांबळे लेंडेगावकर ,डी.जे. गायकवाड,धनंजय कांबळे, महेश चिकटे,धम्म सागर वाघमारे ,प्रदीप सोनकांबळे सुमेध वाघमारे, अमित गायकवाड ,आकाश भालेराव वैभव इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पुष्पाने धुपाने आणि दिपाली पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.जी.दूगाने सर यांनी केले तर आभार एड.राष्ट्रपाल गायकवाड यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
तसेच छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक या ठिकाणी सुद्धा नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साह मध्ये घोषणाबाजी करत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.