आ.बाबासाहेब पाटील यांच्या निधीतून १ कोटी १४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
अहमदपूर( गोविंद काळे ) शिवनखेड खु. येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.पाटील यांनी उपस्थित राहून विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच मा.अमीरअली युसुफअली सय्यद यांची न्यायाधीश मुंबई पदी निवड झाल्याबद्दल शिवणखेड ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला.
विकासकामांमध्ये मुस्लिम वस्ती सामाजिक सभागृहाचे लोकार्पण निधी : २५ लक्ष, आंबेडकर चौक ते मगदुम शेख यांच्या घरापर्यंत रस्ता अंदाजित रक्कम : ७९ लक्ष व आंबेडकर चौक ते मरुमाय मंदिर सिमेंट रस्ता अंदाजित रक्कम : १० लक्ष याचा समावेश आहे.
आजवर अनेक जनसामान्यांची कामे केली आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला. शेतकरी, कष्टकरी, महिला, सर्वसामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. या पुढील काळातही सर्वसमावेशक विकास साधण्यावर आपण भर देत आहोत, असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रुक्सानाबी करीमसाब शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मुंबई हायकोर्ट न्यायाधीश अमीरअली सय्यद, सभापती मंचकरावजी पाटील, उपसभापती संजय पवार, संचालक तथा माजी सभापती चंद्रकांत मद्दे, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, दिलीप ठाकूर, संचालक सतीशराव नवटक्के, नागमोडे साहेब, हडोळती चेअरमन महेशराव हंबीर, हंगरगा चेअरमन शिवाजीराव पवार, रफिकभाई शेख, याकूब भाई शेख, माजी चेअरमन पाशाभाई डांगे, युसुफ भाई सय्यद, प्रमोद पवार, सेवादल तालुका अध्यक्ष विजयकुमार पवार, रामचंद्र गुरमे, माजी सरपंच पंडितराव शिंदे, चेअरमन रामकिशन शिंदे, अब्दुल गफूर, देशमुख सर, परमेश्वर तीरकमटे, गणपतराव घाडगे, शार्दुल सौदागर, खाजासाब सौदागर, हमजा सौदागर, इब्राहिम पटेल, पंढरीनाथ वाघमारे, रामदास पाटील, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी, तलाठी, ग्रा.प सदस्य व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.