अहमदपूर तालुक्यात सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे खा. सुधाकर श्रृगांरे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

अहमदपूर तालुक्यात सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे खा. सुधाकर श्रृगांरे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे )
तालुक्यातील मौजे काळेगाव, अंधोरी, मानखेड,सोनखेड,पाटोदा,काजळ हिप्परगा, उगिलेवाडी येथील सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन खासदार सुधाकर श्रृगांरे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकराव पाटील हे होते.
मौजे काळेगाव येथील जलजिवण योजनेचे एक कोटी सत्येच्याळीस लाख तर खासदार फंडातील काळेगाव ते बौद्ध विहार सिमेंट रोड तिस लाख, सौर ऊर्जा प्रकल्प पाच लाख तर अंधोरी येथील जलजिवण योजनेचे चार कोटी छतीस लाख संत्याऐंशी हजार, खासदार फंडातील पेव्हर ब्लॉक रोड सहा लाख, दलित वस्तीसिंमेट रोड आठ लाख, मानखेड येथील जलजिवण योजनेचे त्रेसष्ट लाख, पेव्हर ब्लॉक रोड विस लाख, सोनखेड येथील जलजिवण योजनेचे बेच्याळीस लाख, पाटोदा येथे जलजिवण योजनेचे सत्येच्याळीस लाख तर उगिलेवाडी येथील जलजिवण योजनेचे बावीस लाख, काजळ हिप्परगा येथील पेव्हर ब्लॉक रोड च्याळीस लाख व सिमेंट रोड दहा लाख अशा एकूण सात कोटी रुपयांच्याविविध विकास कामांचे उदघाटन खासदार सुधाकर श्रृगांरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधानाची सुत्र हाती घेऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महा जनसंपर्क अभियान 30 में ते 30 जून या काळात राबविले जात असून या अभियानांतर्गत काळेगाव, अंधोरी, मानखेड ,काजळ हिप्परगा येथे हर घर संपर्क लातूर जिल्ह्यचे अभियानाचे प्रमुख खासदार सुधाकरजी श्रृगांरे , अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षात सर्व घटकांना न्याय दिला असून,मागेल त्याला घरकुल,मोफत अन्न धान्य,मोफत कोविडची लस, आरोग्य सुविधा पुरविल्या असुन जलजिवण योजनेअंतर्गत हर घर जलपुरवठा केल्याचेही यावेळी खासदार सुधाकर श्रृगांरे व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी उदघाटनाच्या वेळी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष भारत चामे ,भाजपाच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर,प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे,माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकआबा गुट्टे,सभापती निळकंठ मिरकले,माजी सभापती आर. डी. शेळके,प्रशांत पाटील,विठ्ठलराव बोडके,कमलाकर पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी,भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगिरे,माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे,निळकंठ पाटील, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,अमित रेड्डी,रामभाऊ नरवटे,राजकुमार खंदाडे,बाबुराव बावचकर,शिवराज पाटील,राहुल शिवपुजे,किशोर कोरे, बालाजी गुट्टे,सरपंच प्रविण रेड्डी,खिजर जागीरदार,सौ.प्रफुलाताई ब्रींगणे, विक्रम नारागुडे, रविशंकर पाटील,नागेश भिकाणे,विलास पाटील,विक्रम गुट्टे,बालाजी पडोळे, नागनाथ माने, शुभ्रकांत गुंडरे,संतोष कल्याणे,राजकुमार कांडणगिरे,गोविंद बैकरे, सौ.मंगलताई गुट्टे,सुहास सोनकांबळे,अंकुश क्षिरसागर,जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता शेलार,प्रभारी दिनेश दंताळे, उपअभियंता मुळे,गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड,बांधकाम विभागाचे उपअभियंता हत्ते,शाखा अभियंता बाबा शेख, शाखा अभियंता सोनकांबळे,यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author