शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांना फराळाचे वाटप
अहमदपुर ( गोविंद काळे ) शिदवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त एस टी आगार येथे वारकऱ्यांना जेष्ठ शिवसैनिक माधव कासले यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांना फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी अहमदपुर आगार येथे शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणार नेतृत्व म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण याच धोरणानुसार लातुर जिल्ह्यात काम केले जाते, त्याचाच एक भाग म्हणून आज भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे हजारो भाविकांनी, कर्मचारी, एस टी चालक, वाहक, प्रवासी यांनी व्यवस्थित पणे फराळाचा आस्वाद घेतला. आगाराच्या परिसरात झालेला कचरा, प्लेट,पाण्याच्या बाटल्या शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी स्वत्ता साफ सफाई करण्यास सुरुवात केली यामध्ये नगरसेवक संदीप चौधरी, शहर प्रमुख शिवा कासले यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग घेत दहा मिनिटात आगार स्वच्छ केले. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है यासह विविध घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, तालुका संघटक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष रोडगे सर, नगरसेवक संदीप चौधरी, शहर प्रमुख शिवा कासले, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी,ॲटो सेनेचे तालुकाप्रमुख शिवकुमार बेद्रे, उपशहरप्रमुख शिवा भारती, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, सहसचिव पद्माकर पेंढारकर, विभाग प्रमुख गणेश माणे, युवा सेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब पडीले, युवा सेनेचे प्रतिक रेड्डी, शरद मैड, सोशल मीडिया तालुका प्रमुख ओम गुंडरे, अमोल जाधव, असंख्य महिला, नागरीक, भाविक भक्त, वारकरी, कर्मचारी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.