नेताजी सुभाष चंद्र बोस प्राथमिक विद्यालयात आषाढीनिमित्त दिंडी
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील वसवाडी विभागातील नेताजी प्राथमिक विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांची दिंडी आयोजित करण्यात आली होती. दिंडीत शाळेच्या बाल वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत, टाळ मृदंगाच्या गजरात विठुरायाचा गजर करत परिसर भक्तीमय करून सोडला होता.
या विठ्ठल रुक्मिणी पालखीच्या दिंडीची सुरुवात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जी.टी माने व उषा आडे,नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ह. भ.प. श्रीनिवास राऊत, भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.व्ही.अलगुडे शाळेच्या मुख्याध्यापिका एस. बी. मुर्गे, यांच्या शुभहस्ते पालखीची पूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी जी.टी. माने, डी.व्ही. सगरे, ऐ.व्ही.सुकणे, एस. एस.पंढारे, एस. एन.सुरनर, बी. टी. राठोड, ए.जी.ढाले, एस. सूर्यवंशी, विलासराव देशमुख जुनिअर कॉलेजचे प्रा. गिरिधर तेलंगे,श्रीमती कांबळे,अंतोष बेले आदी शिक्षक, शिक्षकेत्तेर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.