नागनाथ निडवदे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

नागनाथ निडवदे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष स्व. नागनाथ अण्णा निडवदे यांच्या जयंतीनिमित्त नळगिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 638 रुग्णांची तपासणी झाली तर 41 जणांनी रक्तदान केले, यावेळी नळगीरकरानी खूप चांगला प्रतिसाद दिला. सर्व ग्रामस्थांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत घेतली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके,भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे ,भाजपचे तालुकध्यक्ष बस्वराज रोडगे,सरपंच अंजुषा उगिले, ग्रामविकास अधिकारी कांबळे, पंडित सूर्यवंशी,ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे,देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप मजगे,नगरसेवक नागेश अष्टुरे, पप्पू गायकवाड,अमित बोळेगावे,रमेश शेरिकर, महेश मलगे,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे,श्रीराम प्रतिष्ठान उदगीरचे सतीश पाटील,अभिजित पाटील,बस्वराज डांगे,सचिन हल्ले,पांडुरंग फड,अविनाश पाटील,विवेक मदनुरे,बालाजी गायकवाड, चैतन्य बोईनवाड यांनी स्व. नागनाथअण्णा निडवदे यांना विनम्र आदरांजली वाहिली.

या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर्स सर्वश्री डॉ. विजय बिराजदार,डॉ. राधिका बिराजदार,डॉ. सुदाम बिरादार,डॉ.रोहिणी भंडारे,डॉ.सचिन टाले, डॉ.अजय सोनटक्के,डॉ.महेश धुमाळे,डॉ. हर्शवर्धन जाधव, डॉ. पवन कल्यने,डॉ.प्रशांत नवटक्के,डॉ.डांगे,डॉ. नाईकवाडे,डॉ. खरात,डॉ. वर्मा आदींनी अतिशय चांगली सेवा देत शिबिर यशस्वी केले. गरजू आणि गरीब रुग्णांना गोळ्या, औषधी देवून मदत केली. यामध्ये मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी महेश ढगे, स्वप्नील फुलारी, नवीन श्रंगारे यांनी केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाकांत थोटे,संतोष वलसने,प्रशांत गायकवाड,सिध्दांत उगीळे,धनराज नादरगे, प्रकाश कापसे,विकास बिरादार,बाळासाहेब वडले,उत्तम किवंडे,निखिल स्वामी,अभिषेक शेटकार,कार्तिक बंडे,सूर्यकांत थोटे,नागनाथ किवंडे,विनोद वळसने,विरेश वळसने,विठ्ठल वळसने,संतोष कोतलापुरे, शिवानंद होंनमोडे,संगम निडवदे,संदीप निडवदे , कुलदीप बिरादार,राजू गुंडीले नळगीर येथील सर्व ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,गणेश मंडळ कार्यकर्ते आणि अमोल निडवदे मित्रपरिवार आदी जणांनी सहकार्य केले.

About The Author