जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने गुरु पौर्णिमा साजरी

जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने गुरु पौर्णिमा साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त हावगीस्वामी महाविद्यालय व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय ,उदगीर येथे प्राध्यापकांना पुष्पगुच्छ आणि पेढ्याने तोंड गोड करून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांच्या आयुष्यात आपल्याला योग्य दिशा दाखवणारे अनेक गुरु असतात, बालपणापासून ते आपण जिथे कामाला लागतो, तिथपर्यंत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक लोक असतात, त्यातील काही लोकांना आपण मनापासून गुरु मानतो. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात तर गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हेच महत्व लक्षात घेता, जीवन प्रयाग फाऊंडेशनने हा शुभेच्छा कार्यक्रम राबवला.

यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी ,अक्षय ददापुरे,कुणाल शिंदे,प्रतिक शिंदे, नितीश शिरसे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author