स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये महाराष्ट्र कबड्डी दिवस साजरा

स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये महाराष्ट्र कबड्डी दिवस साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या वतीने 15 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजता शाळेच्या पटांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कबड्डी दिवस हा कबड्डी सप्ताह स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.

दरवर्षी कबड्डीच्या विकासाचा सारथी,अविरत योद्धा,लाल मातीचा वारकरी म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वर्गीय बुवा साळवी यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये ही कबड्डी सप्ताह स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना कबड्डी खेळाचे महत्व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

सदरील स्पर्धा ही 8 जुलै 2023 ते 15 जुलै 2023 च्या दरम्यान घेण्यात आली.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत मुलाच्या गटामध्ये 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम तर 9 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी द्वितीय व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, उपप्राचार्य श्रीकांत शिवराम, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य मनोरमा शास्त्री, जय हिंद पब्लिक स्कूलच्या मॅनेजर ज्योती स्वामी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, परीक्षा नियंत्रक डॉ.शेषनारायण जाधव, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, प्रा. आकाश कांबळे, कबड्डी राज्य पंच व क्रीडा शिक्षक संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुशांत जाधव, सूर्यकांत कांबळे, सोमेश्वर सूर्यवंशी, राहुल गुडे, सतीश वाघमारे, नीलकंठ सबनीस, राठोड सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author