मनसेकडे तरुणाईचा वाढता ओढा
उदगीर (एल.पी.उगीले) : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, विविध राजकीय पक्षाकडून, नेत्याकडून तरुणाईचा भ्रमनिराश होताना दिसत असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यातून राजकीय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या तरुण वर्गाला आश्वासक नेतृत्व राज ठाकरे यांच्या रूपाने दिसत असल्याने सध्या युवा तरुणांचा ओढा मनसेकडे येताना दिसत आहे. याचाच प्रत्यय गेल्या काही महिन्यापासून उदगीर विधानसभेत दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात चौथा पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला आहे. उदगीर मनसेमध्ये मोठ्या संख्येने तरुण पक्षात दाखल होत आहेत. जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते मनविसे शहर सचिव रोहीत बोईनवाड यांच्या नेतृत्वात तेजस पांढरे, अभय यमलवार, दत्ता कुंभार,वीरभद्रेश्वर कुंभार,रुपेश सदानंदे, नाना कांबळे ,निखिल गायकवाड, शिवराज पाटील ,पंकज जमादार, अभय शेल्हाळे सह त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी मनसे शहराध्यक्ष संतोष भाऊ भोपळे, तालुका सचिव सुनीलजी तोंडचिरकर , शहर सचिव लखन भैय्या पुरी,मनविसे शहर उपाध्यक्ष अविनाश जाधव ,दीपक करक्याळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.