रस्त्याच्या कामासाठी ४१ कोटी १६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर, ना. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
उदगीर (एल.पी.उगीले) : कोणी निंदा अथवा वंदा, विकास करणे हाच आमचा धंदा. हे उद्दिष्ट ठेवून उदगीर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी नामदार संजय बनसोडे यांनी आपले मतदार संघात विकासाचा धडाका चालूच ठेवत रस्त्याच्या कामासाठी निधी खेचून आणला आहे.गेल्या तीन वर्षात ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्रबिंदू समजून उदगीर – जळकोट मतदार संघाचा विकास करण्याचे ध्येय बाळगुन गेल्या अनेक वर्षापासूनचा या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न करून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.संजय बनसोडे हे करत आहेत.
उदगीर – जळकोट मतदार संघातील विविध रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातुन ना.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून तब्बल ४१ कोटी १६ लाख ८६ हजार रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला. लवकरच या विविध रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामध्ये इजीमा ४८ ते करलेवाडी ता.उदगीर रस्ता सुधारण्यासाठी ८० लाख रु, रामा २५० पिंपरी पिर तांडा डोंगरशेळकी तांडा ते इजिमा ४८ रस्त्याच्या सुधारणा करण्यासाठी ४ कोटी, राज्य मार्ग (रामा) २४९ ते निडेबन शेल्हाळ रस्त्यासाठी ३ कोटी ५० लक्ष रु, राज्य मार्ग (रामा) २४९. उदगीर शेल्हाळ ते प्रजिमा ३४ रस्त्यासाठी ४ कोटी रु, जळकोट तालुक्यातील चेरा ते रामा २५१ रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी ८० लक्ष रु, जळकोट तालुक्यातील उमरदरा ते केकतसिंदगी रस्त्यासाठी २ कोटी ४० लक्ष रु, चेरा ते वांजरवाडा रस्त्यसाठी ३० लक्ष रु, इजीमा ४८ ते लाळी बु. येवरी ते शिवखेड रस्त्यासाठी ३ कोटी रु, जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा डोंगरगाव सुल्लाळी मांजरी प्र.जि.मा.२९ सा.क्र.५/५०० डोंगरगाव गावाजवळ लहान पुलाचेक्र. एनबीडी – २०२ बांधकाम करण्यासाठी १६ कोटी १६ लक्ष ८६ हजार रु तर जळकोट तालुक्यातील रावजी तांडा येथील रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ५० लक्ष रुपये असे उदगीर व जळकोट मतदार संघातील विविध रस्त्यासाठी ४१ कोटी १६ लाख ८६ हजार रुपयाचा निधी मंजूर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी मंजूर करुन घेतला आहे. पुन्हा एकदा उदगीर मतदार संघात विकास निधी मंजूर केल्याबद्दला ना.बनसोडे यांचे नागरीकांतुन अभिनंदन होत आहे.