नेता असूनही कार्यकर्ता प्रमाणे सेवा देणाऱ्या युवा नेता राहुल केंद्रे यांच्या निवडीबद्दल जल्लोष!

नेता असूनही कार्यकर्ता प्रमाणे सेवा देणाऱ्या युवा नेता राहुल केंद्रे यांच्या निवडीबद्दल जल्लोष!

उदगीर (एल.पी.उगीले) : लातुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांची लातूर लोकसभा निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. या निवडीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्तिशः राहुल केंद्रे यांचे अभिनंदन करून तुमच्या अंगी असलेल्या नम्रता आणि कार्यकर्ता स्वभाव कायम ठेवा. तुमचे व्यक्तिमत्व चौफेर फुलताना दिसेल, असा आशीर्वाद दिला. आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राहुल केंद्रे हे उदगीरचे माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांचे सुपुत्र आसुन भाजयुमोचे प्रदेश सचिव,उदगीर नगर परिषद नगरसेवक, पाणी पुरवठा सभापती, लोहारा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या पदावर त्यांनी प्रभावशाली काम केले आहे. पक्ष संघटना बांधणीसाठी तळागाळातील लोकांची सेवा करणे आणि अडीअडचणीला धावून जाण्याचा गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे लातूर जिल्ह्यात या युवा नेत्याबद्दल आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले आहेत. दुःखी कष्टी लोकांच्या अडीअडचणीला धावून जाऊन आपल्या पदाचा योग्य वापर करून गरिबांना उपचार करून देणे, जमेलच्या पद्धतीने सहकार्य करणे हे कार्य त्यांनी करून दाखवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनमानसामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल देशपातळीवर लातूर जिल्हा परिषदेचा गौरव झाला आहे त्यांनी केलेले हे उल्लेखनीय काम लातूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारे आह . सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम केले पाहिजे या भावनेतून त्यांनी काम केले आहे.राहुल केंद्रे यांनी कमी वयात उदगीर तालुक्यासह लातूर जिल्ह्यात युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यावर जिल्हा परिषदेचे माध्यमातून प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले.कोवीड काळात जिवाची पर्वा न करता कोरोना बाधीत लोकांना मदत करून कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले.जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषदचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या सर्व कामाची पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन निवड केली आहे. या पुर्वी पक्षश्रेष्ठींनी भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त जाती भागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी केंद्रे यांची निवड केली आहे.

राहुल केंद्रे व भाजपाच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीपराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल उदगीर येथील छत्रपती शिवाजी चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.या वेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भारतीयजनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, गणेश गायकवाड, उदयसिंग ठाकूर, शहाजी पाटील तळेगावकर,सुजित जिवणे, मंगेश यरकुंडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटन बांधणीच्या दृष्टीने अत्यंत कार्य कुशल त्याने काम करणाऱ्या राहुल केंद्रे यांना लातूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा सोपवून तरुण पिढीवर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवल्याबद्दल तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

About The Author