प्रा.अतुल अनंतराव पागे यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत पी.एचडी पदवी प्रदान
अहमदपूर, ( गोविंद काळे): येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्रा.अतुल अनंतराव पागे यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत पी.एचडी पदवी प्रदान झाल्याने माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राणीशास्त्रात ” स्टडी ऑफ इंडोहेल्मेन्ट फाउना इन इंटेस्टाइन ऑफ गोट ” या विषयावर प्रबंध सादर केला होता.नांदेड येथील यशवंत वरिष्ठ महाविद्यालय प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.धनराज भुरे यांनी मार्गदर्शन केले.त्यांना पी.एचडी पदवी प्रदान करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.चंद्रशेखर हिवरे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे जीवशास्त्र विषयाचे संचालक डॉ.शिवाजी चव्हाण यांची उपस्थिती होती.
या यशाबद्दल विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.किशनराव बेंडकुळे, सचिव ॲड.पी.डी.कदम, प्राचार्य कॅप्टन डॉ.अनिता शिंदे, उपप्राचार्य प्रभाकर बाबुळगावकर, उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे, रवींद्र क्षीरसागर, प्रा.रत्नाकर नळेगावकर, अजहर बागवान अभय मिरकले, चंद्रशेखर भालेराव यांच्यासह मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.