एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या नितीन बिरादार यांचे तोंडारकरांचा वतीने सत्कार

एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या नितीन बिरादार यांचे तोंडारकरांचा वतीने सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत तोंडारचा सुपुत्र नितीन मनोहर बिरादार हा उत्तीर्ण झाल्याने समस्त तोंडारकरांचा वतीने गावात प्रवेश करताच त्याच स्वागत करण्यात आले.घरची परिस्थिती बेताची असताना ही आपली जिद्द चिकाटी कौशल्यचां उपयोग करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालय मध्ये त्याची निवड करण्यात आली आहे.

तोंडारकरांचा वतीने प्रथम गावात आल्याने त्यांचे फटाक्यांच्या आतशबाजीने व महात्मा बसवेश्वर युवा गणेश मंडळांच्या वतीने शाल फेटा व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास अण्णा बिरादार, आनंदराव मालोदे, बंडेप्पा मुळे, मल्लिकार्जुन बिरादार, मनोहर बिरादार (आंबेशत), बाबुराव भांजी, दिलीप पटवारी,सतिष बिरादार सह महात्मा बसवेश्वर युवा गणेश मंडळ चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!