लग्नाचे आमिष दाखवून जबरी संभोग, गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून जबरी संभोग, गुन्हा दाखल

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळउन नेऊन जबरी संभोग केल्याची तक्रार उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून आरोपी नितीश मधुकर वाघमारे रा .गोविंद नगर उदगीर आणि पिराजी गायकवाड रा. शेळकी यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 227/23 कलम 363, 366, 376, 34 भारतीय दंड विधान संहिता आणि कलम 4, 8, 12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहरातील वडार गल्ली भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस आरोपींनी संगणमत करून आरोपी नितीश याने फिर्यादीचे इंस्टावर पाठलाग करून मेसेज करून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या घराजवळ येऊन फिर्यादीस मोटरसायकलवर बसउन त्याचा भाऊ पिराजी यांच्या घरी डोंगर शेळके येथे नेऊन फिर्यादीशी शारीरिक संबंध केले. वगैरे जाबावावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव या करत आहेत.

About The Author